कोरोनाच्या पॉझिटिव्हीटी दरात चढ-उतार; दर एक टक्क्याच्या खाली

corona  patient
corona patient sakal media
Updated on

मुंबई : लसीकरणाप्रमाणेच (corona vaccination) , कोरोना चाचणीच्या (corona test) पॉझिटिव्हीटी दरातही (Mumbai positivity rate) चढ-उतार होत आहे. नोव्हेंबरमधील शेवटच्या रविवारी मुंबईचा पॉझिटिव्हीटी दर एक टक्क्यांहून अधिक होता, मात्र मंगळवारी तो पुन्हा एक टक्क्याच्या खाली (below one percent) आला. मंगळवारी पॉझिटिव्हीटी दर 0.88 टक्के होता.

corona  patient
मुंबईत महापालिका राबवणार सहावा सिरो सर्वे

ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये मुंबईतील चाचणीचा आलेख ३२ टक्क्यांनी कमी होता. चाचणीच्या अभावासोबतच पॉझिटिव्हीटीच्या दरांमध्येही चढउतार दिसून आले आहेत. या महिन्यात 1, 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी 30 हजारांहून अधिक लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या तीन दिवसांत पॉझिटिव्हीटी दर एक टक्क्याच्या खाली राहिला. 1 नोव्हेंबर रोजी पॉझिटिव्हीटी दर 0.82 टक्के होता, तर 3 नोव्हेंबर रोजी पॉझिटिव्हीटी दर 0.95 टक्के आणि 4 नोव्हेंबर रोजी पॉझिटिव्हीटी दर 0.74 टक्के होता.

7 नोव्हेंबर रोजी पॉझिटिव्हीटीचा दर एक टक्क्यांहून अधिक झाला होता. तर 7 नोव्हेंबर रोजी 30 हजारांहून कमी चाचण्या झाल्या. कमी चाचणीत जास्त रुग्ण पॉझिटिव्ह येणे ही मुंबईसाठी चिंताजनक बाब असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. पालिका आरोग्य विभागाच्या मते, मंगळवारी मुंबईचा पॉझिटिव्हीटी दर 0.88 टक्के आहे, जो 1 नोव्हेंबरच्या तुलनेत जास्त होता. 1 नोव्हेंबर रोजी पॉझिटिव्हीटी दर 0.82 टक्के होता.

corona  patient
"मलिक आजोबांच्या छान छान गोष्टी परिकथांच्या पुस्तकांमध्ये अजरामर होतील"

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, पॉझिटिव्हीटी दरात चढ-उतार होत असला तरी मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे. आता सणांचे वातावरण संपले आहेत, शिवाय चाचण्यांची संख्या वाढणार आहे. येत्या काही दिवसांत पॉझिटिव्हीटी दर वाढला तर मुंबईसाठी ही चिंताजनक बाब ठरू शकते.

साप्ताहिक रुग्ण वाढीचा दर घटला

मुंबईतील कोरोना रुग्णांचा साप्ताहिक वाढीचा दरही घसरत आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस वाढीचा दर 0.05 टक्के होता, जो नोव्हेंबरच्या सुरुवातीला 0.04 टक्क्यांपर्यंत घसरला. या 9 दिवसांत त्यात आणखी घट झाली आहे. मंगळवारी कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर 0.03 टक्क्यांवर पोहोचला आहे.

दुप्पटीचा दर वाढला

कोरोना रुग्णांच्या दुप्पट होण्याचा कालावधी म्हणजेच दुप्पट होण्याचे प्रमाणही वाढले आहे. 1 नोव्हेंबरला मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 1595 दिवसांचा होता, जो मंगळवारी, 9 नोव्हेंबर रोजी 2244 दिवसांवर पोहोचला. मुंबईचा दुप्पट होण्याचा दर 9 दिवसांत 649 दिवसांपर्यंत वाढला आहे.

नोव्हेंबरचा पॉझिटिव्हीटी दर

 तारीख कोरोना रुग्ण चाचणी दर (टक्क्यांत)

    1 267 32221 0.82

    2 228 29093 0.78

    3 330 34442 0.95

    4 262 35018 0.74

    5 238 24901 0.95

    6 176 25431 0.69

    7 252 24935 1.01

    8 210  2531 0.82

    9 279 31585 0.88

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.