मुंबई : नायर रुग्णालयात (Nair hospital) लहान मुलांवरील कोवोवॅक्स लशीच्या चाचणीला (covovax vaccine) पालकांचा प्रतिसाद मिळत आहे. महिन्याभरात ३७ मुलांची नोंदणी झाली असून त्यांच्यावर लशीची चाचणी (vaccine test) घेण्यात आली आहे. त्यामुळे १५ दिवसांत लशीचा प्रतिसाद वाढल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल (dr ramesh bharmal) यांनी सांगितले.
महापालिकेच्या नायर रुग्णालयाची निवड झायडस कंपनीच्या झायकोव्ह-डी लशीच्या चाचणीसाठी करण्यात आली. त्यानंतर आता कोवोवॅक्सची चाचणी सुरू झाली आहे. पालिकेच्या नायर रुग्णालयात २ ते १७ वयोगटातील ९२० मुलांवर ही चाचणी घेण्यात येणार असून महिन्याभरात ३७ मुलांवर ही चाचणी करण्यात आली आहे.
पालक मुलांना चाचणीसाठी आणण्यास टाळाटाळ करत असल्याचे बोलले जात असले तरी मुलांच्या कोविडपासून बचावासाठी १५ दिवसांत २० हून अधिक पालकांनी या लशीच्या चाचणीसाठी पुढाकार घेतला असून विचारणा देखील वाढल्याचा दावा डॉ. भारमल यांनी केला आहे. महापालिकेने अलीकडेच केलेल्या सेरो सर्वेक्षणानुसार ५० टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्याने मुलांमध्ये मार्गदर्शक सूचनेनुसार लशीची चाचणी घेता येणार नाही.
लसीकरणासाठी तीन गट
लहान मुलांच्या लसीकरणाच्या चाचणीसाठी नवीन नियमावली बनवण्यात आली आहे. त्यानुसार पालिकेने २ ते १८ वर्षे वयोगटासाठी तीन गट बनवण्यात आले आहेत. यामध्ये २ ते ७ वर्षे, ८ ते ११ आणि १२ ते १८ वर्षे असे वयोगट तयार करण्यात येत आहेत. चाचणीसाठी प्रतिसाद वाढण्याची गरज असल्याचे डॉ. भारमल यांनी सांगितले.
"मुलांच्या लसीकरणाच्या चाचणीसाठी नोंदणी सुरू आहे. पालकही लशीसाठी विचारणा करत आहेत. पालक-मुलांनी लसीकरणासाठी पुढाकार घेत मुलांच्या लस चाचणीसाठी माहिती आणि नोंदणीसाठी २३०२७२०५ आणि २३०२७२०४ या क्रमांकावर संपर्क साधावा."
- डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.