मुंबई : मुंबईत कोविड बधिताच्या (Corona patient) एकही मृत्यूची (Zero Death) नोंद आज झाली नाही. कोविड काळात 20 मार्च 2020 नंतर शून्य मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिसऱ्या लाटेची (corona third wave) शक्यता वर्तवण्यात येत असतांना मृतांचा आकडा (corona deaths) शून्यावर आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. आज 0 कोविड मृत्यूची नोंद झाली झाली. मृतांचा एकूण आकडा 16,180 वर पोहोचला आहे. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के झाला आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1214 दिवस झाला. आज दिवसभरात 28,697 कोविड चाचण्या (corona test) झाल्या असून आतापर्यंत 1,09,57,392 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या 5030 सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोना बाधित रुग्णांचा आकडा तुलनेने काहीसा वाढला असून आज दिवसभरात 367 नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,50,808 वर पोहोचली आहे. तर आज ही नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचा आकडा अधिक असून 518 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 7,27,084 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुबईतील झोपडपट्टी व चाळीत एकही सक्रिय कंटेंमेंट झोन नाही. मात्र सक्रिय सीलबंद इमारती 50 आहेत. गेल्या 24 तासांत अति जोखमीचे 2206 व्यक्ती सापडल्या असून 538 अति जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींना कोविड काळजी केंद्र 1 मध्ये दाखल करण्यात आले. मुंबईत आतापर्यंत 97 टक्के लोकांनी लसीची पहिली मात्रा घेतली असून 55 टक्के लोकांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंग चहल यांनी दिली.
"26 मार्च 2020 नंतर मुंबईत शून्य कोविड मृत्यूची पहिल्यांदाच नोंद झाली. यासाठी मी पालिकेच्या सर्व टीमचे कौतुक करतो.पालिकेच्या उपाययोजनांवर विश्वास ठेवून पाठिंबा देणाऱ्या प्रसार माध्यमांचे ही मी मनापासून आभार मानतो. आपण सर्वांजण नियमित मास्क वापरूया, लसीकरणावर जोर देऊया. मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी आम्हाला मदत करा."
- इकबाल सिंग चहल , आयुक्त , मुंबई महानगरपालिका
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.