Corona : ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात मुलांमध्ये संसर्गात वाढ 

Corona-patient
Corona-patientSakal media
Updated on

मुंबई : ऑक्टोबर महिन्याच्या (October month) 1 ते 15 तारखेपर्यंत 19 वर्षाखालील कोविड रुग्णांमध्ये (corona patients) वाढ झाली. या वयोगटात पंधरा दिवसांपूर्वी 7.3 टक्के एवढे रूग्ण होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसात या रुग्णांमध्ये 7.8 टक्के एवढी वाढ (patients increases) झाली आहे. यामुळे, पालिकेने (BMC) काळजी घेत पुढील निर्णय घेण्याचा पवित्रा घेतला आहे.

Corona-patient
मुंबई : पावसाळी आजारांचा विळखा

या पुढे बाधित मुलांची संख्या वाढेल की कमी होईल यावरून पालक आणि प्रशासन यांच्यात सध्या साशंकतेचे वातावरण आहे. याच दरम्यान शाळा सुरु झाल्याने यावरूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मागच्या आठवड्यात आठवी नववीचे वर्ग सुरु करण्यात आले. आणि लगेचच मुलांमध्ये बाधा होण्याची आकडेवारी वाढली.

पहिल्या लाटेत मार्च 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत 19 वयाखालील 18 हजार 94 मुले बाधित झाली होती. याची सरासरी 5.7 टक्के एवढी होती. मात्र जशी दुसरी लाट सुरु झाली तशी लहान मुलांच्या संसर्गात वाढ होण्यास सुरुवात झाली. जून पर्यंत 13 टक्के वाढ झाली असल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट होते. तर, त्यानंतर आणखी 10 टक्क्यांची भर पडत आहे. आता रुग्ण संख्या कमी होत असल्याने आणि लसीकरणाची वाढते प्रमाण पाहता सरकारने 4 ऑक्टोबर पासून आठवी नववीचे वर्ग खुले करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले.

Corona-patient
प्रलंबित मागण्या दिवाळीपूर्वी मान्य करा अन्यथा उपोषण

1 ते 15 ऑक्टॉबर च्या कालावधीत 9 वर्षाखालील 202 मुलांना तर 10 ते 19 वयोगटातील 578 मुलांना कोविद संसर्ग झाला. तर, सप्टेंबर महिन्यात याच वयोगटातील अनुक्रमे 425 आणि 1048 मुले बाधित झाली होती. याचा अर्थ 10 ते 19 वयोगटातील मुलांमध्ये 0.5 टक्क्यांनी वाढ झाली.  दरम्यान कोविड रुग्णांमध्ये सध्या वाढ होत नसली तरी कोविड संपलेला नाही. त्यामुळे आम्ही वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहोत. लोकांनी निष्काळजी पणा केल्यास स्थिती चटकन बदलू शकते असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()