मुंबईत सक्रिय रुग्णांचा आलेख चढाच!

राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या घटली, चार जिल्ह्यांत भीती कायम
Corona patients
Corona patientssakal media
Updated on

मुंबई : मुंबईत सक्रिय रुग्णांचा (Corona active patients) आलेख चढाच असून दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या गेल्या एका महिन्याच्या तुलनेत घटली (patients decreases) आहे. तर, राज्यातील चार जिल्ह्यांत भीती  कायम आहे तर, 7 जिल्ह्यांत सक्रिय रुग्णांची एक अंकी रुग्णसंख्या आहे. दरम्यान, मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिकेची (bmc) चिंता वाढली आहे.

Corona patients
दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची हायकोर्टात याचिका

राज्याच्या कोविड 19 च्या आकडेवारीनुसार, 21 ऑगस्टपर्यंत 53,967 सक्रिय प्रकरणे आढळून आली होती. आता या सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन राज्यात 22 सप्टेंबरपर्यंत 39, 984 एवढे सक्रिय रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे, मुंबई शहरात सध्या 4,706 सक्रिय प्रकरणे आहेत आणि हीच रुग्णसंख्या एका महिन्यापूर्वी 2 हजारांच्या दरम्यान होती. तर, राज्यात 13, 983 हजारांनी सक्रिय रुग्णांमध्ये घट झाली आहे.

राज्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लावण्यात आलेले कडक नियम आणि नागरिकांमध्ये असलेली जागरुकता शिवाय, संशयित रुग्णांनी वेळेत घेतलेले उपचार तसेच, वाढलेले लसीकरण या सर्वामुळे संख्येत घट आणि सक्रिय रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. कोविड 19 सक्रिय रुग्ण हे सध्या राज्यातील वेगवेगळ्या  रुग्णालयात आणि कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत शिवाय, होम क्वारंटाईन आहेत.

राज्यातील संसर्गजन्य रोग प्रतिबंधक नियंत्रण आणि टेक्निकल समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात जर आतासारखीच परिस्थिती राहिली तर येत्या मार्चपर्यंत परिस्थिती बर्यापैकी सुधारेल. मात्र, लोकांनी कोविडचे सर्व नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. दरम्यान, जानेवारीपर्यंत किमान सतर्क राहण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून आधीच देण्यात आले आहेत. 

Corona patients
सांगा, संजय राऊत कोणाचं थोबाड फोडलं पाहिजे - चित्रा वाघ

राज्यातील सक्रिय रुग्णांचा आलेख

21 ऑगस्ट - 53,967

31 ऑगस्ट- 51,238

1 सप्टेंबर - 51, 078

5 सप्टेंबर - 50,095

10 सप्टेंबर - 49, 812

15 सप्टेंबर  - 49,034

20 सप्टेंबर - 41,672

22 सप्टेंबर - 39, 984

चार जिल्ह्यांत सक्रिय रुग्ण सर्वाधिक

राज्यातील सक्रिय रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण चार जिल्ह्यांत आहेत. राज्याच्या आकडेवारीनुसार मुंबई, पुणे, ठाणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्ण जास्त आहेत. या चार ही जिल्ह्यांमध्ये 5 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.

पुणे - 11344

मुंबई- 5083

ठाणे - 5507

अहमदनगर - 5100

एक अंकी सक्रिय रुग्ण असलेले जिल्हे

नंदूरबार - 1

धुळे - 1

वाशिम - 7

यवतमाळ - 5

वर्धा - 5

भंडारा -3

गोंदिया - 7

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.