मुंबईत लसीकरणाची विक्रमी नोंद ; एका दिवसात 2 लाखांचा टप्पा पार

corona vaccination
corona vaccinationsakal media
Updated on

मुंबई: मुंबईत दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत (corona vaccination) आज रेकॉर्ड ब्रेक (vaccination record) लसीकरण झाले आहे. मुंबईतील महापालिका, शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्र (corona vaccination centers) मिळून एकाच दिवशी एकूण 2 लाख 58 हजार 288 नागरिकांचे लसीकरण (lots of people vaccinated) झाले आहे. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून ही आकडेवारी सर्वोत्तम आहे.

corona vaccination
चित्रपट निर्माते प्रदीप गुहा कालवश!

मुंबईत लसीच्या अभावामुळे गुरुवार आणि शुक्रवारी महापालिका आणि सरकारी लसीकरण बंद असले तरी शनिवारी मोठ्या संख्येने लोकांना लसीकरण करण्यात आले. फक्त महापालिका केंद्रांमध्येच 1 लाख 03 हजार 325 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे, तर 1 लाख 47 हजार 175 लोकांना खासगी केंद्रांवर लसीकरण करण्यात आले आहे. मुंबईत एकूण 85 लाख 2 हजार 77 लोकांना लसीकरण करण्यात आले आहे, त्यापैकी 63 लाख 40 हजार 138 जणांनी पहिला डोस घेतला आहे आणि 21 लाख 61 हजार 939 ने दोन्ही डोस घेतले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.