एकच नंबर! मुंबईतील अँटिजेन टेस्टचा अहवाल समोर, वाचा सविस्तर

एकच नंबर! मुंबईतील अँटिजेन टेस्टचा अहवाल समोर, वाचा सविस्तर
Updated on

मुंबईः कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबई शहराला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबईत काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आलं आहे. मुंबईत शनिवारी दिवसभरात १२५४ नवीन रुग्ण आढळलेत. मुंबईत शनिवारी दिवसभरात ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.  दरम्यान मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.  मुंबईत केवळ ५.८ टक्के लोकांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समजतेय.

मुंबईत आरोग्य विभागाकडून  एकूण ५६ हजार ८२५ लोकांची अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यातील फक्त ३ हजार ३५० लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुंबई शहरात सुमारे ५० हजार ४६२ लोकांची टेस्ट करण्यात आली. त्यापैकी २ हजार ५३१ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समजतंय. उपनगरात ६ हजार ३९० लोकांना कोरोना झाला होता. त्यापैकी ८१९ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. 

कोरोना व्हायरसच्या टेस्टचा रिपोर्ट २४ तासात येतो. त्यामुळे कमी वेळात संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारकडून अँटिजेन टेस्ट सुरु करण्यात आल्या. 

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांच्या वर्गाला आहे. त्यामुळे महापालिकेने मोठ्या प्रमाणावर डोअर टू डोअर सर्व्हे केला. त्यानुसार घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांच्या शरीराचे तापमान आणि ऑक्सिजनची पातळी तपासण्यात आली.  पालिकेनं एप्रिलपासून ज्येष्ठ नागरिकांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. या वयोगटातील नागरिकांना या व्हायसरचा अधिक धोका आहे. तेव्हा पालिकेनं शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या ऑक्सिजनची पातळी तपासण्यास सुरुवात केली होती, जे ते कार्य अद्यापही सुरु आहे. मुंबईत आतापर्यंत १ कोटी ६० लाख ४० हजार १५९ लोकांची स्क्रीनिंग करण्यात आलेली आहे. त्यात ८ लाख ३ हजार ८५५ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. त्यात ८० हजार ८४२ ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी योग्य असल्याचं दिसून आलं तर ३०१३ ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरात ९५ टक्के ऑक्सिजनची पातळी कमी असल्याचं दिसून आलं.

Mumbai corona virus antigen test report 5 8 percentage positive

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.