दादरमध्ये ड्रेनेजमध्ये अडकली गाय; वाचवण्याचे प्रयत्न शर्थीने सुरु

Mumbai: Cows stuck in drainage
Mumbai: Cows stuck in drainage
Updated on

मुंबई: मुंबईत ड्रेनेजमध्ये गाय अडकल्याची घटना घडली आहे. मुंबईतील दादरमधली ही घटना असून गायीला बाहेर काढण्याचे प्रयत्न शर्थीने सुरु आहेत. दादरमधील कबुतर खान्याजवळ ड्रेनेजच्या टाकीत ही गाय पडली आहे. सध्या महानगरपालिका आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. ड्रेनेजच्या टाकीत गाय पडल्याची ही घटना मुंबईतील दादर भागात असलेल्या भवानी शंकर रोडवरील कबुतर खाना परिसरात उघडकीस आली आहे. (Mumbai: Cows stuck in drainage)

Mumbai: Cows stuck in drainage
यूपीतील भाजपच्या विजयानंतर वाटली मिठाई; मुस्लिम युवकाची मारहाण करुन हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. ही पडलेली गाय त्या ड्रेनेजच्या टाकीच्या झाकणावर उभी होती. त्यावेळी अचानकच त्या ड्रेनेजच्या टाकीचं झाकण सरकलं आणि ही गाय टाकीत पडली, अशी माहिती तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. सध्या या गायीला सुखरुपरित्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तसेच बीएमसीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. या पडलेल्या गायीला सुखरुपपणे बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असून लवकरच तिला बाहेर काढलं जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या ड्रेनेजच्या आजूबाजूचा भाग सध्या खोदण्यात येत आहे. तिला बाहेर निघण्यासाठी मोकळी जागा करण्यात येत असून याद्वारे तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, हे करत असताना त्या गायीला कोणत्याही प्रकारची इजा होऊ न देण्याचा प्रयत्न देखील कर्मचारी कटाक्षाने करत आहेत. (Dadar)

Mumbai: Cows stuck in drainage
हिंदूंनाही 'अल्पसंख्याक' दर्जा मिळणार, केंद्राचं कोर्टात स्पष्टीकरण

सध्या या अडकलेल्या गायीला दिलासा मिळावा यासाठी खायला चारा आणि पाणीही देण्यात आलं आहे. दादरमधील हा भाग गजबजलेला असल्याने ही गाय टाकीत पडल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दुसकीडे कर्मचारीही या गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात असल्याने या परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. (Dadar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.