Latest Mumbai News: डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बदनामीची भीती दाखवून विवाहित प्रियकराने आतापर्यंत एक कोटी रुपये उकळल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
अवैझ ताझिम अहमद या प्रियकराविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (ता. २१) फसवणुकीसह लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तक्रारदार महिला ही कुर्ला येथे राहते. दोन वर्षांपूर्वी तिची सोशल मीडियावरून अवैझ याच्याशी मैत्री झाली होती. त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते.