Mumbai Crime : 23 वर्षीय हवाई सुंदरीच्या हत्या प्रकरणाचा उलगडा; आरोपी सफाई कर्मचारी...

Mumbai Crime
Mumbai Crime
Updated on

मुंबई - मुंबईजवळील पवई इथं एका विमान कंपनीत एअर होस्टेस अर्थात हवाई सुंदरी म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. मरोळ इथल्या राहत्या घरी तिचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा उलगडा झाला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Air Hostess Rupal Ogare Murder in Mumbai)

Mumbai Crime
Maratha Reservation : मराठ्यांचा आरक्षणासाठी संघर्ष, मग कुणबींना कसं मिळालं? 'या' नेत्याचा मोठा हात; जाणून घ्या सविस्तर

हत्ये प्रकरणी इमारतीत सफाईच काम करणाऱ्या इसमाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. मरोळ येथील राहत्या घरी तरुणीचा मृतदेह सापडला होता. तरुणीची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रूपल ओगरे (वय २३, मूळगाव रायपूर, छत्तीसगड) असं या एअर होस्टेसचं नाव आहे.

Mumbai Crime
Maharashtra Politics: पहिल्यांदाच फडणवीस झाले कॉर्नर, CM शिंदे-अजित पवारांचे जुळले सुर?

हत्येची घटना घडली तेव्हा रुपल घरी एकटीच होती कारण तिची बहिण आणि मित्र हे दोघेही आपल्या गावी गेले होते. पवई पोलीस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास तातडीने सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()