Mumbai Crime: कार विकत देण्याच्या बहाण्याने कार डिलर चौकडीने अनेकांना घातला लाखोंचा गंडा

एपीएमसी पोलिसांकडुन चौकडीचा शोध सुरु
Fraud
Fraudsakal
Updated on

Navi Mumbai Crime: एपीएमसीतील सत्रा प्लाझामध्ये युनिव्हर्सल कार रेंटल सोल्युशन नावाने कार्यालय चालविणाऱया चौकडीने व्यवसायासाठी कार विकत घेऊ इच्छिणाऱया अनेक व्यक्तींकडून ऍडव्हॉन्समध्ये लाखो रुपये घेऊन त्यांना कार न देता, तसेच कार बुकींगसाठी घेतलेली रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या टोळीने अनेक लोकांच्या नावावर इलेक्ट्रीक स्कुटी खरेदी करण्यासाठी त्यांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावार परस्पर कर्ज काढून त्यांची देखील फसवणुक केली आहे. एपीएमसी या कंपनीतील चौकडी विरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

Fraud
Mumbai Crime Ram Mandir: "रामभक्त आहोत, दर्शन घडवून आणतो", महिलेला गंडा घालून लाखोंचे दागिने पळवले

या प्रकणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्यामध्ये निशा गोसावी, फारुख, भाग्यश्री, अकुंश पवार या चौघांचा समावेश आहे. या चौकडीने 2022 मध्ये एपीएमसीतील सत्रा प्लाझा मध्ये युनिव्हर्सल कार रेंटल सोल्युशन या नावाने कार्यालय सुरु केले होते. तसेच ते कार विक्रीचे डिलर म्हणून काम करत होते. या डिलर कंपनीकडे जे व्यक्ती टी-परमीट कार खरेदी करण्यासाठी येत होते,

त्यांच्याकडून ते 90 हजार ते 1 लाख रुपये बुकींगची रक्कम घेत होते. बोरीवली येथे राहणाऱया योगेश बांदल (39) याने देखील युनिव्हर्सल कार रेंटल सोल्युशन या कंपनीकडे 90 हजार रुपये देऊन टी-परमिटची कार बुकिंग केली होती. त्यानंतर त्याने वैयक्तीक कर्ज काढून कारची उर्वरीत 7 लाख 47 हजाराची रक्कम सुद्धा दिली होती.

मात्र या डीलर कंपनीतील चौकडीने त्याला कारची डिलीव्हरी न देता टाळाटाळ केली. त्यानंतर योगेश बांदल याने या चौकडीच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे मोबाईल फोन बंद असल्याचे आढळुन आले.

Fraud
Mumbai Local Crime: लोकलमध्ये महिला असुरक्षित? सततच्या घटनांमुळे सुरक्षा प्रश्न ऐरणीवर!

त्यामुळे त्याने पएाrएमसीतील सत्रा प्लाझा येथील युनिव्हर्सल कार रेंटल सोल्युशनच्या कार्यालयात धाव घेतली असता, त्या सर्वांनी कार्यालय बंद करुन पलायन केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर योगेश बांदलने सदर कंपनीची माहिती काढली असता, सदर कंपनीतील चौकडीने अनेकांची फसवणूक केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने एपीएमसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

या प्रकरणातील आरोपी चौकडीने कारच्या बुकींगसाठी 28 व्यक्तींकडून ऍडव्हान्स म्हणुन तब्बल 44 लाख रुपये तर योगेश बांदल याच्याकडून 8 लाख 38 हजार रुपये अशी एकुण 52 लाख 43 हजार रुपये घेऊन त्यांना कार न देता तसेच कार बुकींगसाठी दिलेली रक्कम परत न करता त्यांची फसवणुक केली आहे.

त्याचप्रमाणे या चौकडीने 12 व्यक्तींना दरमहा 7 हजार रुपये देण्याचे मान्य करुन त्यांच्याकडून कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावावर कर्ज काढुन त्यांची देखील फसवणुक केली आहे. सध्या हे 12 व्यक्ती सदर कर्जाचे हप्ते भरत आहेत. त्याशिवाय या चौकडीने काही लोकांकडुन त्यांची कार भाडयाने लावण्याच्या बहाण्याने देखील अनेकांकडुन पैसे उकळल्याचे समजते

Fraud
Mumbai Crime: बिल्डरच्या हत्येप्रकरणी पाच जणांना जन्मठेप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.