Navi Mumbai News: क्रिप्टो करन्सी प्रकारातील बिटकॉईनमधील गुंतवणूकीवर जास्त परतावा देण्याचे अमिष दाखवुन एका सायबर टोळीने नेरुळमध्ये राहणाऱया व्यावसायीकाला तब्बल 4 कोटी 53 लाख रुपये गुंतवणुक करण्यास भाग पाडुन त्याला कोणताही फायदा अथवा त्याने गुंतवणुक केलेली रक्कम परत न करता त्याची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणातील सायबर टोळीविरोधात फसवणुकीसह अपहार तसेच आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
या प्रकरणात फसवणुक झालेला 37 वर्षीय व्यावसायीक नेरुळमध्ये राहण्यास असून त्याचा कन्स्ट्रक्शन व फॅब्रीकेशनचा व्यवसाय आहे. जानेवारी 2021 मध्ये एका अज्ञात व्यक्तीने या व्यवसायीकाला मेसेज पाठवून बिटकॉईन खरेदी करण्याबाबत माहिती दिली होती. तसेच बिटकॉईनमध्ये गुंतवणुक केल्यास कसा फायदा होईल याची देखील माहिती देण्यात आली होती. त्यामुळे या व्यवसायीकाने बिटकॉईनमध्ये गुंतवणुक करण्याची तयारी दर्शविल्यानंतर सायबर चोरटयानी या व्यवसायीकाला एका लिंकद्वारे बाझीगर रईस-11 या ऍपमध्ये जॉईन केले.
त्यानंतर बिटकॉईनमध्ये गुंतवणुक करण्यासाठी या व्यवसायीकाला बँकेचे खाते क्रं.त्याचप्रमाणे युपीआय आयडी देऊन त्यावर पैसे पाठवण्यास सांगण्यात आले. या व्यवसायीकाने बिटकॉईन खरेदी केल्यानंतर त्यावर होणाऱया नफ्याची माहिती बाझीगर रईस-11 या ऍपवर दाखविण्यात येत होती. त्यामुळे सदर नफा पाहून या व्यवसायीकाने आणखी रक्कम गुंतवण्यास सुरुवात केली. त्यानंतर सायबर चोरटयाकडुन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन संपर्क साधुन या व्यावसायीकाला वेगवेगळे बँक खाते देऊन त्यावर पैसे भरण्यास सांगण्यात येत होते.
अशा पद्धतीने या व्यवसायीकाने गत 3 वर्षामध्ये 4 कोटी 53 लाखापेक्षा अधिकची रक्कम गुंतवणुक केली. काही महिन्यापुर्वी या व्यावसायीकाने त्याला गुंतवणुकीसाठी वारंवार संपर्क करणाऱया सायबर चोरटयाना संपर्क साधुन त्यांच्याकडे गुंतवणुक केलेल्या रक्कमेची मागणी केली. मात्र या व्यावसायीकाला त्यांच्याकडुन पैसे परत मिळाले नाहीत. त्यानंतर आपली फसणवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या व्यावसायीकाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सहा महिन्यापुर्वी साजन कुमार नामक व्यक्तीने या प्रकरणात फसवणुक झालेल्या व्यवसायीकाची भेट घेऊन दुबईमध्ये असलेल्या अमित मजिठिया व संजय सोनी यांच्याकडुन बाझीगर रईस-11 या नावाने बनावट कंपनी चालवण्यात येत असल्याचे सांगितले होते. तसेच लोकांना फसवण्यासाठी त्यांनी 50 व्यक्तींना कामाला ठेवल्याचे तसेच त्यांनीच त्याची देखील फसवणुक केल्याचे सांगितले होते. मात्र त्यावेळी या व्यवसायीकाला त्याने केलेल्या गुंतवणुकवर चांगला लाभ झाल्याचे ऍपवर दिसत असल्याने या व्यवसायीकाने साजन कुमार याच्या सांगण्यावर विश्वास ठेवला नाही. त्यानंतर देखील या व्यवसायीकाने बाझीगर रईस-11 या ऍपद्वारे पैशांची गुंतवणुक सुरुच ठेवली होती. काही महिन्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे या व्यावसायीकाला लक्षात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.