Mumbai Crime: मुंबईत वास्तव्य करणाऱ्या 6 बांगलादेशींना अटक

wadi bandar अवैध वास्तव्यावर पोलिसांची कारवाई; बांगलादेशींना अटक | police action on illegal settlements; Bangladeshis arrested
mumbai crime
mumbai crimesakal
Updated on

Mumbai Crime: मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांना 3 वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत अटक आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

अमीना उमर फारुख शेख, इम्रान आलम शेख, तमजीत शौकत मुल्ला, आलमीन जावेद सरदार, हसन नूरइस्लाम मोरल आणि सुकेराली खालेक मंडल अशी या चौघांची नावे असून, हे सर्व बांगलादेशी नागरिक आहे. बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून सर्वजण भारतात पळून आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

mumbai crime
Navi Mumbai Crime: घरफोडी करणाऱया सराईत दुक्कलीला पोलिसांनी केली अटक!

शनिवारी रात्री वाडीबंदर, बीपीटी रोडवर काही बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती.या माहितीनंतर पोलिसांनी तिथे छापा टाकून अमीना शेख या 36 वर्षांच्या महिलेस अटक केली.

दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी रविवारी आलमीन सरदार आणि हसन मोरल या दोघांना दिंडोशी पोलिसांच्या एका विशेष पथकाने मालाड येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, जागृती बसस्टॉपजवळील मंसुरी स्टोअरसमोरून अटक केली. ते दोघेही बांगलादेशी नागरिक असून सध्या वसई येथे राहत होते. तिसऱ्या कारवाईत सहार पोलिसांनी सुकेराली मंडल याला अटक केली. अन्य 2 घटनेत तमजीत मुल्ला याला वर्सोवा तर इम्रानला दहिसर पोलिसांनी अटक केली.

mumbai crime
Mumbai Crime: गांजा विक्री करणाऱ्या तीन महिलांसह चारजण अटकेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.