मुंबई- नागपाडा परिसरात ८ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कानातले विक्री करणाऱ्याने चिमुकलीवर हात टाकला आहे. चिमुरडीला कानातले दाखवण्याचा नावाखाली आरोपीने लैंगिक हल्ला केला आहे.
कानातले विक्री करणाऱ्या झुबेर शाहला नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. शेजारी उभ्या असलेल्या महिलेने नराधमाला असे कृत्य करताना पाहिले. त्यानंतर तिने आरडाओरडा सुरु केला. पळून जात असताना झुबेर शाह याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. माहितीनुसार, विनयभंग आणि पॉक्सो कायद्यांतर्गत नराधमाला अटक करण्यात आली आहे.