मुंबई : धावत्या मुंबई-पनवेल लोकलमध्ये एका तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना बुधवारी (ता.१४ जून) ला समोर आली. सीएसएमटी आणि मस्जिद बंदर स्थानका दरम्यान ही घटना झाल्याने दोन्ही स्थानकावरचे सीसिटीव्ही फूटेज तपासले गेले.
आरोपीचे फूटेज मिळाल्याबरोबर ४ तासात आरोपीला अटक झाली. दोन्ही स्थानकावरुन दररोज हजारो प्रवाशी प्रवास करतात. अशा वेळी स्टेशनबाहेर गेलेल्या आरोपीला शोधणे जिकरीचे काम असते. मात्र आरोपीने लाल रंगाचा शर्ट आणि पँट घातल्याने त्याला हुडकून काढणे सोपे झाल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगीतले.
चार तपास पथके
या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी सर्व प्रथम गुन्हे शाखा, सीएसएमटी पोलीस, दादर रेल्वे पोलीस, आणि आरपीएफ पोलिसांच्या एकत्रीत ४ तपास पथके तयार केली. त्यातील एक पथक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत होते. दोन पथक सीएसएमटी आणि मशीद बंदर रेल्वे स्थानकावर आरोपीचा शोध घेत होते. तर चौथे पथक मुंबई शहर हद्दीत आरोपीच्या मागावर होते.
दररोज सीएसएमटी आणि मशीद बंदर स्टेशन प्रवाशांच्या गर्दीने गजबजले असतात. एकदा आरोपी स्थानकाच्या बाहेर पडला तर त्याला शोधणे हे आव्हात्मक असते. मात्र या आरोपीने एकाच रंगाचा पोषाख घातला असल्यामुळे त्याला पकडणे सोपे झाले. साधारणत: एकाच रंगाचा, त्यात लाल रंगाचा ड्रेस फार कमी लोक परिधान करतात.
प्रत्येक रेल्वे स्थानकावर लाल रंगाचे शर्ट आणि पॅट परिधान केलेल्या व्यक्तीचा शोध घेत होते. या दरम्यान मस्जिद बंद रेल्वे स्थानक बाहेर या रंगाचा ड्रेस घाललेला एक व्यक्ती दिसून आला. पोलिसांनी या संशयीताला ताब्यात घेवून त्याची विचारपूस केली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
घटनेच्या वेळी आऱोपी दारुच्या नशेत होता. दारुचा अंमल न उतरल्यामुळे तो मस्जिद बंदर परिसरात थांबला होता असेही पोलिसांनी सांगितले. आरोपीचे नाव नवाजु करीम शेख, वय ४० वर्षे आहे. तो बिहारच्या किसनगंज जिल्हाचा राहिवासी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झालेले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.