Mumbai Crime : लग्नात वऱ्हाडी बनून आरोपीला पोलिसांकडून अटक

दादर पोलिसांनी 14 महिन्यांपासून पळून गेलेल्या एका दरोडेखोर आरोपीला पकडण्यासाठी यवतमाळपर्यंत 500 किमीहून अधिक प्रवास केला.
mumbai crime accused arrested by police groom in wedding yavatmal
mumbai crime accused arrested by police groom in wedding yavatmalesakal
Updated on

मुंबई : लग्नाच्या वरातीत वऱ्हाडी बनून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विनोद देवकरला पोलिसांनी यवतमाळहून अटक केली आहे. दादर पोलिसांनी 14 महिन्यांपासून पळून गेलेल्या एका दरोडेखोर आरोपीला पकडण्यासाठी यवतमाळपर्यंत 500 किमीहून अधिक प्रवास केला.

पोलिसांना गोपनीय सुत्राकडून 30 वर्षीय संशयित विनोद देवकर एका लग्नाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी लग्नाचे वऱ्हाडी म्हणून लग्नाला उपस्थित राहण्याची योजना आखली . आरोपी देवकर हा 50 लाखांच्या दरोड्यातील पाहिजे आरोपी होता.

17 मार्च 2022 रोजी व्यावसायिक प्रदीप कानडे घरात घुसून 50 लाख रुपये रोख घेऊन फरार झाला होता.त्यानंतर दादर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. आरोपी देवकरने डुप्लिकेट चावीचा वापरून घरात प्रवेश केल्याचे तपास करताना पोलिसांना समजले. आरोपी देवकर व्यावसायिकाकडे चालक म्हणून कार्यरत होता.

व्यावसायिक काही कामानिमित्त मुंबई बाहेर गेले जात असताना त्याने घराच्या चाव्या देवकर यांच्याकडे दिल्या होत्या. त्यानंतर संधीसाधून आरोपीने व्यावसायिकाच्या घरात 50 लाख रुपयांची चोरी करून फरार झाला. या गुन्ह्यात देवकरच्या चार नातेवाइकांनी साथ दिल्याचे तपासात समोर आले. म्हणून त्यांनाही अटक करण्यात आली आहे, परंतु देवकर मात्र फरारच राहिला.

देवकर गुन्ह्यात मुख्य गुन्हेगार असल्याने पोलीस त्याला शोधत होते. पोलिसांना गोपनीय सुत्राकडून 30 वर्षीय संशयित विनोद देवकर एका लग्नाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली होती.तातडीने पोलीस पथकाने यवतमाळला जाण्याचा निर्णय घेतला.त्यांनी लग्नाला वऱ्हाडी म्हणून हजर राहून समारंभाच्या वेळी आरोपीला पकडण्याची योजना आखली.त्याप्रमाणे पोलिसांनी वऱ्हाडी बनून आरोपी देवकरला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.