Mumbai Crime: नऊ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गजाआड करण्यात अंधेरी पोलिसांना यश आले. मोहम्मद तन्वीरअली इमाम अन्सारी असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध अशाच प्रकारे भागलपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यात त्याला दिडोंशीतील विशेष सेशन न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. ६ डिसेंबरला अंधेरी येथे राहणाऱ्या एका नऊ वर्षांच्या मुलीचा अज्ञात तरुणाने विनयभंग केला होता.
याप्रकरणी गुन्हा नोंद होताच सहायक पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संताजी घोरपडे यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक परकाळे, पोलिस अंमलदार राजू पेडणेकर यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली होती.
दीडशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर संशयित आरोपी माहीम आणि मिनारा मशिदीजवळ येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी सलग पाच दिवस तिथे पाळत ठेवून मोहम्मद तन्वीरअली अन्सारीला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच या मुलीचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.