Mumbai Crime: वृद्ध महिलेचे पावणे दोन लाखांचे दागिने भामटयानी लुबाडले

वृद्धा शिकार ठरल्या फसवणुकीच्या जाळ्यात; भामट्यांकडून दागिन्यांची चोरी | The old woman became a victim in the trap of fraud; Theft of jewels by Bhamtas
Mumbai Crime: वृद्ध महिलेचे पावणे दोन लाखांचे दागिने भामटयानी लुबाडले
sakal
Updated on

Navi Mumbai: बतावणी करुन महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांचे दागिने लुबाडणाऱया भामटयानी वाशीमध्ये दाताच्या उपचारासाठी आलेल्या 76 वर्षीय वृद्ध महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्याजवळचे 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे दागिने लुबाडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील दोघा भामटÎांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

Mumbai Crime: वृद्ध महिलेचे पावणे दोन लाखांचे दागिने भामटयानी लुबाडले
Navi Mumbai Crime: वाशीत भरदिवसा दोन घरफोड्या; लाखोंचे दागिने गेले चोरीला

या घटनेतील 76 वर्षीय वृद्ध महिला गौरी कनोजिया या कोपरखैरणे सेक्टर-20 मध्ये कुटुंबासह राहण्यास असून गत मंगळवारी दुपारी 12 वाजता त्या वाशी सेक्टर-10 मध्ये डेंटल चेकअपसाठी आल्या होत्या. यावेळी त्या शबरी हॉटेल येथे बसमधुन उतरुन पायी चालत जात असताना तेथील भाजी मार्केटमध्ये दोघा भामटयानी त्यांच्यासोबत ओळख वाढवून त्यांच्या सेठाणीचा मुलगा आजारी असल्याचे सांगितले.

तसेच सेठाणीच्या मुलाला आशीर्वाद देण्यास सांगून त्यांना बोलण्यात गुंतवले. याचवेळी दोघा भामटयानी या वृद्धेच्या हातातील दिड लाख रुपये किंमतीच्या 4 सोन्याच्या बांगडया तसेच 30 हजार रुपये किंमतीच्या 2 अंगठया पिशवीत काढून ठेवण्याचा बहाणा केला.

Mumbai Crime: वृद्ध महिलेचे पावणे दोन लाखांचे दागिने भामटयानी लुबाडले
Navi Mumbai Crime: वाशीत भरदिवसा दोन घरफोड्या; लाखोंचे दागिने गेले चोरीला

यावेळी वृद्धेने आपले 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे दागिने काढुन पिशवीत ठेवण्याचा प्रयत्न केला असताना, सदर भामटयानी त्यांचे दागिने व्यवस्थित पिशवीत ठेवण्याच्या बहाण्याने आपल्याकडे घेऊन हातचलाखी करुन त्यांचे दागिने चोरले.

त्यानंतर सदर भामटयानी रिकामी पिशवी गौरी कनोजिया यांना देऊन त्याठिकाणावरुन पळ काढला. काही वेळानंतर गौरी कनोजिया यांनी पिशवी तपासली असता, त्यात दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर दोघा भामटयानी त्यांचे दागिने लुबाडुन नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Mumbai Crime: वृद्ध महिलेचे पावणे दोन लाखांचे दागिने भामटयानी लुबाडले
Navi Mumbai News : नवी मुंबई पोलीस दलातील उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.