Crime News: युनानी डॉक्टर असल्याची बतावणी करुन 14 लाखांचा गंडा; उपचारांच्या बहाण्याने वृद्धाच्या शरीरातून 710 वेळा काढलं रक्त

बनावट युनानी आणि आयुर्वेदिक डॉक्टर्स असल्याचे दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.
Crime News
Crime NewsEsakal
Updated on

बनावट युनानी आणि आयुर्वेदिक डॉक्टर्स असल्याचे दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. एका प्रकरणात या टोळीने दोन तासांत एका वृद्धाचे 710 वेळा रक्त काढून त्याची 14.5 लाख रुपयांची फसवणूक केली. हे धक्कादायक प्रकरण मुंबईतील आहे. डीसीपी राज तिलक रोशन यांनी सांगितले की, त्यांच्या टीमने आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. या टोळीतील इतर अनेकांचाही शोध सुरू आहे.(Latest Marathi News)

दक्षिण मुंबईतील एक 61 वर्षीय व्यावसायिक गेल्या अनेक वर्षांपासून आजारी आहेत. 11 नोव्हेंबर रोजी ते काही कामानिमित्त नरिमन पॉइंट येथे गेले होते. तेव्हा काही लोकांनी त्याचे शरीर थरथरत पाहिले आणि त्याला विचारले की त्याला हा आजार कधीपासून आहे आणि त्याने कोणत्या डॉक्टरांकडे उपचार केले. यानंतर या टोळीतील एका सदस्याने स्वत:ची ओळख युनानी डॉक्टर असल्याचे सांगितले. त्यांना असलेला हा आजार दोन तासांत पूर्णपणे बरा करू शकतात असंही ते म्हणालेत.

Crime News
Mumbai Crime: कुर्ल्यात सापडलेल्या सुटकेसमधील महिलेच्या हत्येच्या प्रकरणाचा झाला उलगडा; लिव्ह इन रिलेशनमध्ये...

गुन्हे शाखेच्या युनिट-3 चे वरिष्ठ निरीक्षक दीपक सुर्वे यांनी सांगितले की, व्यावसायिक त्याच्या जाळ्यात सापडला. त्याने या लोकांना आपल्या घरी नेले. आरोपीने त्याला झोपायला लावले. त्यानंतर त्याच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी धातूचे शंकू दाबले गेले.

धातूच्या शंकूच्या दाबाने शरीराच्या वेगवेगळ्या भागात रक्त साचल्यावर आरोपीने त्या भागावर थोडेसे रक्त लावले. शरीरातून थोडेसे रक्त येताच आरोपीने जिभेने मुलतानी माती लावली. त्यामुळे बाहेर आलेले रक्त पिवळे दिसू लागले. आरोपीने व्यावसायिकाला सांगितले की, त्याच्या शरीरात खूप घाण जमा झाली आहे. यामुळे तुमचे रक्त पिवळे दिसत होते. आता तुमचा आजार पूर्णपणे नाहीसा झाला आहे. (Marathi Tajya Batmya)

Crime News
Karjat Crime:'त्या' सहा जणांवर गुन्हा दाखल ! ५ लाख रुपयांसाठी झालेल्या छळाला कंटाळून विवाहतेने उचललं होतं टोकाचं पाऊल

आरोपीने त्या दिवशी एकूण 710 वेळा व्यावसायिकाचे रक्त काढले आणि त्याबदल्यात त्याच्याकडून 14.5 लाख रुपये रोख घेतले. त्यादरम्यान व्यावसायिकाने आरोपींकडून मोबाईल क्रमांकही घेतला होता.

मोबाईल बंद आढळला

काही काळानंतर, व्यावसायिकाला वाटले की आपला आजार तसाच आहे. त्यांनी तातडीने उपचार करणाऱ्या व्यक्तीला बोलावून घेतले. मात्र मोबाईल बंद होता. आपली फसवणूक झाल्याचे व्यावसायिकाला समजले. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.

अशा प्रकारे 10 जणांच्या टोळीचा पर्दाफाश झाला

त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने बंद केलेला मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज यांच्या मदतीने आरोपीचे लोकेशन ट्रॅक करण्यास सुरुवात केली. त्यातच वरिष्ठ निरीक्षक दीपक सुर्वे आणि समीर मुजावर यांना आरोपी मोहम्मद शेरू शेख हा मालेगाव येथे आढळून आला. त्याच्या चौकशीदरम्यान मोहम्मद नफीस शरीफ, मोहम्मद आसिफ निसार आणि मोहम्मद आसिफ शरीफ यांना भिवंडी, ठाणे आणि इतरत्र मनोर येथे तंबूत अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत त्याच्या आणखी दहा साथीदारांची नावे समोर आली आहेत.(Latest Maharashtra News)

अटक केलेले आणि फरार झालेले सर्व आरोपी राजस्थानचे

अटक केलेले आणि फरार झालेले सर्व आरोपी राजस्थानचे आहेत. हे लोक गेल्या अनेक वर्षांपासून देशातील विविध शहरात उपचाराच्या नावाखाली फसवणुकीचा हा धंदा करत होते. हे लोक हॉस्पिटलच्या बाहेर किंवा बागेत कोणीही वृद्ध व्यक्ती आजारी दिसली किंवा फिरताना दिसली की, ते त्याच्याकडे जाऊन उपचाराच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करतात, तशीच त्यांनी नरिमन पॉइंटच्या व्यावसायिकाची फसवणूक केली.

फसवणुकीतून एवढी कमाई करूनही हे लोक कोणत्याही महागड्या किंवा स्वस्त हॉटेलमध्ये मुक्काम करत नसत, तर काही वेगळ्या ठिकाणी तंबू ठोकून तिथेच झोपायचे. हे लोक फसवणूक झाल्यावर लगेचच आपले सिम बदलायचे. त्यांच्याकडून मुंबई गुन्हे शाखेने 9 मोबाईल फोन आणि अनेक सिमकार्ड जप्त केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.