Mumbai News: माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने सलमान वोहरा या व्यक्तीस अकोला जिल्ह्यातील बाळापूर परिसरातून रविवारी अटक केली.
अटक आरोपी गुजरातच्या आनंदचा रहिवासी असून त्याने आपल्या बँक खात्यात आलेली रक्कम आरोपी गुरमेल सिंग, रुपेश मोहोळ, हरीश कुमार यांना पोहोचली होती. तसेच, त्याने अन्य आरोपींनाही अर्थसाह्य केले. हीच रक्कम सिद्दीकी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आली, अशी माहिती तपासातून उघड झाली आहे. अकोला पोलिसांच्या मदतीने गुन्हे शाखेने ही कारवाई केली असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.