पोलिसांनी एकच वेळी 7 चोरीच्या घटनांची उकल केली असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुंबई - दहिसर पोलिसांनी एकच वेळी 7 चोरीच्या घटनांची उकल केली असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे अबू इक्बाल अहमद खान (22), अर्जुन उर्फ काल्या नरसिंग विश्वकर्मा (19) शाहिद अली मोहम्मद शेख (22) अशी आहे. आरोपींना मीरा रोड आणि मुंबईतील दहिसर परिसरातून अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईतील दहिसर पोलिसांनी एकाचवेळी उकल केलेल्या सात मोठ्या चोरीच्या प्रकरणामध्ये एका मंदिरातील दानपेटी चोरी, दुचाकी चोरी आणि मोबाईल फोन चोरीच्या गुन्ह्याचा समावेश आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 डिसेंबरच्या रात्री मुंबईतील दहिसर परिसरातील मंदिरातून मोबाईल फोन आणि मंदिराची दानपेटी चोरीला गेली होती.
या प्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. गुप्त बातमीदाराकडुन पोलिसाना माहिती प्राप्त झाली की, सदर गुन्हयात सहभागी असलेले आरोपी हे दहिसर स्टेशन पूर्व भाजी मार्केट परिसरात फिरत आहेत. त्यावरून पोलिसांनी सापळा रचुन दोन आरोपींना ताब्यात घेतले. पोलीसांनी त्यांचा तपास करून तिसऱ्या आरोपिताला देखील मिरारोड येथुन ताब्यात घेतले आहे.
तपासात अटक 3 आरोपींचा एकुण 7 गुन्हयांमध्ये सहभाग निष्पन्न झाला आहे. त्यामध्ये दहीसर पोलिस ठाण्याचे एकुण 6 गुन्हे व अंधेरी पोलिस ठाण्याचा 1 गुन्हा उघडकीस आलेला आहे. आरोपितांकडुन एकुण 3 मोटारसायकल 1.75 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल व रूपये 8 हजार रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.