Mumbai Crime: आर्थर रोड कारागृहातून गेला पळून मग पोलिसांनी केली अटक, वाचा घटनाक्रम

Arthur Road Jail: जोशी मार्ग पोलिसांनी अमोलविरुद्ध कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
Mumbai Crime: आर्थर रोड कारागृहातून गेला पळून मग पोलिसांनी केली अटक, वाचा घटनाक्रम
Updated on

Latest Crime News: आर्थर रोड कारागृहात नेताना शुक्रवारी पळून गेलेल्या अमोल पांडुरंग शेलार या ३८ वर्षांच्या आरोपीला शनिवारी पहाटे खार दांडा परिसरातून खार पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली.

अमोल हा त्याच्या आईला भेटण्यासाठी आला होता. या वेळी तिथे आधीच पाळत ठेवलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी ना. म जोशी मार्ग पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.