Mumbai Crime: तोतया पोलिसांची दिवसाढवळ्या लुटमार, दोन तरुणांविरोधात गुन्हा

Mumbai : नेहमीप्रमाणे त्याने जमा झालेले ३.२० लाख रुपये सोबत घेतले आणि वांद्रे तलावाजवळील बँक शाखा गाठली.
Mumbai Crime: तोतया पोलिसांची दिवसाढवळ्या लुटमार, दोन तरुणांविरोधात गुन्हा
Mumbai Crimesakal
Updated on

Bandra Crime: मुंबई - व्यवसायात जमा झालेली ३.२० लाख रुपयांची रक्कम भरण्यासाठी बँकेत आलेल्या तरुणाला तोतया पोलिसांनी भरदिवसा लुटले. हा प्रकार वांद्रे तलाव ते कार्टर रोड परिसरात मंगळवारी संध्याकाळी घडला. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी दोन तरुणांविरोधात गुन्हा नोंदवला.

शाहरुख शेरीफ असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. शाहरुख मूळचा केरळचा असून सहा महिन्यांपूर्वी पोटापाण्यासाठी मुंबईत आला. त्याच्या काकांचा माहीम येथे जुन्या कार खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यात शाहरुख अकाऊंटंट आहे. दिवसभर झालेल्या व्यवहारातील रक्कम बँकेत जमा करण्याची जबाबदारी शाहरुखवर होती. नेहमीप्रमाणे त्याने जमा झालेले ३.२० लाख रुपये सोबत घेतले आणि वांद्रे तलावाजवळील बँक शाखा गाठली.

Mumbai Crime: तोतया पोलिसांची दिवसाढवळ्या लुटमार, दोन तरुणांविरोधात गुन्हा
Mumbai Crime: जीम ट्रेनरचा तरुणावर हल्ला, तरुण गंभीर जखमी!

शाहरुख यंत्राद्वारे रक्कम जमा करत असताना त्याच्या मागे एक तरुण उभा राहिला. गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे त्याने सांगितले. इतकी रक्कम तुझ्याकडे कुठून आली, असे विचारून या तरुणाने शाहरुखला.बळजबरी बाहेर आणत एका रिक्षात बसवले. त्यात आधीपासूनच अन्य तरुण हजर होता. रक्कम असलेली बॅग दोघांनी हिसकावून घेतली. रिक्षा कार्टर रोडवर येताच त्यांनी शाहरुखला खाली उतरवले, बॅगही दिली. त्याने बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यात रोकड नव्हती.

शाहरुखने दिलेले वर्णन आणि सीसीटिव्हीच्या मदतीने वांद्रे पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत.

Mumbai Crime: तोतया पोलिसांची दिवसाढवळ्या लुटमार, दोन तरुणांविरोधात गुन्हा
Mumbai Cyber Crime: सायबर पोलिस आहे म्हणून फोन आला अन्.. जागरूक नागरिकाने असा उधळला लूटमारीचा प्रयत्न उधळला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()