Crime: मुंबईत 80 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त; महसूल विभागाची कारवाई

हिरॉईन जप्त
हिरॉईन जप्तSakal
Updated on

मुंबई : गुजरात बंदराबरोबर मुंबईतही अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढल्याची माहिती असून महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबईत 80 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. त्याचबरोबर केरळमधील तस्करी करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. एका ट्रॉली बॅगमध्ये लपवून हेरॉईनची तस्करी केली जात होती.

(DRI Seized 16 kg of High Quality Heroin)

मुंबई विमानतळावर ही कारवाई करण्यात आली असून केरळमधील एक प्रवासी आपल्या ट्रॉली बॅगमधील एका पोकळीत जवळपास सोळा किलाे हेरॉईन भरून घेऊन जात असताना महसूल विभागाने त्याला अटक केली आहे. यामध्ये हे सोळा किलो हेरॉईनसहित या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

तर याआधी मुंबईत विमानतळावर चप्पल आणि अंतर्वस्त्रामध्ये घालून अंमली पदार्थाची तस्करी केल्याच्या घटना घडल्या आहेत. ३ ऑक्टोबर रोजी अदिस अबाबा येथून आलेल्या इथियोपियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ET-610 मधून जवळपास 9.8 कोटी रुपये किमतीचे 980 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले.

अंतर्वस्त्रातून हेरॉईनची तस्करी

आदिस अबाबा येथून इथियोपियन एअरलाईन्सच्या विमानातून हे कोकेन जप्त करण्यात आले होते. सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली असून सदर व्यक्तीने अंडरवेअर मध्ये लपवून कोकेन आणले होते. तर 29 सप्टेंबर रोजी एका महिलेने सँडलमध्ये लपवून 6 कोटी रूपयांचे कोकेन आणले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()