Mumbai Crime: मुंबईत महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ..; प्रतिदिन 16 गुन्ह्यांची नोंद

पोलिसांची समाधानकारक कामगिरी!
Crime News
Crime NewsEsakal
Updated on

Mumbai Crime: राज्यात महिलासंदर्भातील महिलांवर बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राज्यात महिलांचा विनयभंग आणि अश्लील वर्तनाचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार गेल्या 10 महिन्यात महिला अत्याचाराच्या प्रतिदिन 16 गुन्ह्यांची नोंद होत असल्याची आकडेवारीत माहिती मिळत आहे.

Crime News
Mumbai Crime : चाकूचा धाक दाखवून प्रवाशास लुटणाऱ्या दोघांना अटक; कल्याण स्टेशन परिसरातील घटना

सध्याची परिस्थिती

मुंबईत यावर्षी पहिल्या 10 महिन्यांत मुंबईत महिला अत्याचाराचे एकूण 4403 गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दिलासादायक म्हणजे पोलिसांनी यापैकी 3974 प्रकरणाची उकल केली आहे. महिला विरोधात अत्याचाराचे 90% प्रकरणे सोडवण्यात मुंबई पोलिसाना यश मिळाले आहे. महिलांचे विनयभंग/अश्लील वर्तनाच्या 1572 घटना नोंदवल्या गेली आहेत. याच कालावधीत 442 बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आहे. 300 मुली / अल्पवयीन तरुणींना फूस लावून किंवा वेगवेगळी आमिषे दाखवून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.तसेच कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळीसारख्या गुन्ह्याची सुद्धा नोंद करण्यात आली आहे.

5% गुन्ह्यात घट

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या पहिल्या चार महिन्यात महिलांविरुद्ध अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये 5 टक्के घट झाल्याची पाहिला मिळते. जिथे गेल्या वर्षी 2022 सालच्या जानेवारी ते ऑक्टोबर या काळात महिलांवरील अत्याचाराच्या 4637 गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्यांपैकी फक्त 3511 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं होते. तर यावर्षी पहिल्या 10 महिन्यात महिला अत्याचाराचे 4403 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये 3974 गुन्ह्याची उकल पोलिसांनी केली आहे.

Crime News
Mumbai Crime : धक्कादायक! टिटवाळा रेल्वे स्थानक नजीक फोनवर बोलत चाललेल्या महिलेला झुडपात खेचून केला अतिप्रसंग

पोलिसांच्या उपाययोजना

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी महिला गुन्ह्यांची सुनावणी लवकर होऊन गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासाठी 60 दिवसांत गुन्हेगारांवर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी पोलीस गस्त घालणे, निर्जन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, एकाकी महिला असतील तर त्यांना घरी नेण्याची व्यवस्था करणे, निर्भया पथक, निर्भया पेटी आणि महिला सुरक्षेसंबंधी इतर महत्त्वाच्या सूचना जारी केल्या.दरम्यान, महिलांची सुरक्षा आणि व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या जात आहेत. यामुळेच कदाचित वर्षी महिलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाहीतर यामुळे तपासाचं प्रमाणही वाढलं आहे.

Crime News
Mumbai Crime News: मुंबईत महिला डॉक्टरवर अत्याचार, ३८ वर्षीय व्यक्तीला अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.