मुंबई - केंद्रीय अमली पदार्थ तस्कराने एम.डी. तस्कर आरिफ भुजावाला याला अटक केल्यानंतर त्याचे पाकिस्तान कनेक्शन समोर आले आहे. आरिफ भुजवाला याच्या पत्नीने पाकिस्तानवारी केल्याची माहिती तपासात समोर आल्याने त्याअनुषंगाने पुढील तपासास एनसीबीने सुरुवात केली आहे.
भुजावाला आणि त्याचा साथीदार चिंकू पठाण यांचे कुख्यात तस्कर केलास राजपूत याच्याशी संबंध, दोघांनी पश्चिम आशियात हवालाद्वारे केलेला आर्थिक व्यवहार यापूर्वीच तपासात समोर आला आहे. त्यामुळे यातील पाकिस्तान कनेक्शनला आता अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भुजावाला याची पत्नी पाकिस्तानमध्ये कशासाठी गेली, कोणाला भेटली, याबाबत चौकशी सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
एनसीबीने दोन आठवड्यांपूर्वी कोपरखैरणे परिसरातून पठाण याला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून भुजवाला याचे नाव पुढे आले. तसेच डोंगरी येथील नूर मंझील इमारतीत "एमडी' निर्मितीसाठी उभारलेला कारखानाही एनसीबीने उद्ध्वस्त केला. त्यानंतर भुजावाला याला रायगड जिल्ह्यातील माणगाव येथून अटक करण्यात आली. डोंगरी येथील कारखान्यातून सव्वादोन कोटींची रोकड, कोट्यवधींचे तयार एमडी आणि रसायने जप्त करण्यात आली होती. या कारवाईनंतर भुजावाला, पठाण यांच्या मालमत्तांबाबत तपास एनसीबी करत आहे.
डोंगरी, मिरा रोडमध्ये मालमत्ता
भुजवाला याने डोंगरी, मुंबई सेंट्रल, वसई, मिरा रोड परिसरात कोट्यवधींची मालमत्ता विकत घेतल्याची माहिती पुढे आली आहे, तसेच त्याची पाच ते सहा बॅंक खाती गोठवण्यात आली असून त्याद्वारे केलेल्या व्यवहाराची चौकशी सुरू असल्याचे एनसीबी अधिकाऱ्याने सांगितले आहे
--------------------------------------------
mumbai crime latest Pakistan connection of wife of Arif Bhujawala in ban chemical issue
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.