Mumbai Crime: पोलिसांची मोठी कारवाई; चार गावठी पिस्तूले व ५९ जिवंत काडतुसे जप्त

Mira Bhaindar Crime: काशी मिरा पोलीस ठाणे व गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे ही कामगिरी पार पाडली.
Mumbai Crime: पोलिसांची मोठी कारवाई; चार गावठी पिस्तूले व ५९ जिवंत काडतुसे जप्त
Updated on

Mumbai Crime: गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसांच्या माध्यमातून व्यवसायात प्रतिपर्धी असलेल्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न पोलीसांनी हाणून पाडला आहे.

पोलीसांनी याप्रकरणी ४ गावठी पिस्तूले व ५९ जिवंत काडतु्से हस्तगत करुन दोन आरोपींना अटक केली आहे. काशी मिरा पोलीस ठाणे व गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे ही कामगिरी पार पाडली.

Mumbai Crime: पोलिसांची मोठी कारवाई; चार गावठी पिस्तूले व ५९ जिवंत काडतुसे जप्त
Navi Mumbai Crime: घणसोलीत बेकायदा राहणारे पाच बांगलादेशी जेरबंद

गोल्डन नेस्ट सर्कल जवळ असणाया अलम स्टील अँड फर्नीचर येथे काम करणाया इसमांकडे विनापरवाना पिस्तूल व जिवंत काडतूसे असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.

त्याप्रमाणे चौकशी केल्यानंतर फिरोज आलम शफीऊल्ला चौधरी याच्या ताब्यात १ गावठी पिस्टल व १० जिवंत काडतुस तर  शाकीर अब्दुल वहाब चौधरी याच्या ताब्यात १ गावठी पिस्टल व ६ जिवंत काडतूसे आढळून आली.

Mumbai Crime: पोलिसांची मोठी कारवाई; चार गावठी पिस्तूले व ५९ जिवंत काडतुसे जप्त
Mumbai Crime: पत्नी सोबत राहत नसल्याने दादर, कल्याण स्थानके उडवण्याची दिली धमकी; पोलिसांनी केली अटक

त्यानंतर आरोपींकडे अधिक चौकशी केली असता फिरोज ऊर्फ इब्राहीम आलम शफीऊल्ला चौधरी याला अमान स्टिल किचन इक्वीपमेंटचे मालक अनिस ऊर्फ मुन्ना खान व कमिल खान त्याचप्रमाणे शादाब स्टीलचा मालक शादाब यांच्या मुळे व्यवसायामध्ये भरपुर नुकसान झाले होते. त्यांना धडा शिकविण्यासाठी चौधरी याने त्याच्याकडे पूर्वी काम करणारा मुस्लीम याच्याकरवी ६ गावठी पिस्तूले व जिवंत काडतूसे मागवली.

त्यापैकी दोन गावठी पिस्तुले व जिवंत काडतूसे त्याने तीन दिवसांपूर्वी अनिस ऊर्फ मुन्ना खान यांच्या नकळत त्यांच्या दुकानात ठेवली तर दोन पिस्तुले व १२ काडतूसे त्याने एका बॅगेमध्ये ठेवून ते वर्सोवा पुलावरुन खाडीत फेकुन दिले.

Mumbai Crime: पोलिसांची मोठी कारवाई; चार गावठी पिस्तूले व ५९ जिवंत काडतुसे जप्त
Mumbai Crime: जेसीबी चालकाने केली पत्नीची हत्या अन् सुसाईड नोट लिहित.., वाचा थक्क करणार प्रकरण

तसेच त्याच्याकडे सापडलेले पिस्तुल व काडतूसे तो एक दोन दिवसात कमिल खान यांच्या दुकानात ठेवणार होता. त्याचप्रमाणे दूसरा आरोपी शाकीर अब्दुल वहाब चीधरी याच्या ताब्यात मिळून आलेले पिस्तुल व काडतूसे तो एक दोन दिवसात शादाब यांच्या दुकानात ठेवणार होता अशी कबुली आरोपींनी दिली,

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबूरे, परिमंडळ - १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा कक्ष १ चे पोलिस निरी अविराज कुराडे, काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे, यांच्या पथकाने पार पाडली.

Mumbai Crime: पोलिसांची मोठी कारवाई; चार गावठी पिस्तूले व ५९ जिवंत काडतुसे जप्त
Mumbai Local Crime: धावत्या लोकलमध्ये दहा वर्षीय मुलीची छेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.