Mumbai Crime : पालिकेचे मध्यवर्ती खरेदी खाते 'ईडी'च्या रडारवर; अधिकारी-कर्मचारी धास्तावले

bmc election
bmc election sakal
Updated on

मुंबई - मुंबई महानगर पालिकेचे अधिका-यांवर ईडीच्या धाडी टाकल्या असतानाच आता पालिकेचे खरेदी खाते ईडीच्या रडारवर आहे. कोरोना काळात या खात्यातून मोठ्या प्रमाणात खरेदी झाली होती. त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे या खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी धास्तावले आहे.

bmc election
Mumbai News : 'म्हाडा'मध्ये अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; आता 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

कोरोना काळात मुंबईतील अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. ईडीने या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण आणि संजय राऊतांचे विश्वासू सुजित पाटकर यांची चौकशी केली होती.

त्यानंतर आता मुंबई महापालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या घरी धाड टाकत ईडीच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याच्या ईडीने चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे या खात्याच्या अधिका-याची धाबे दणाणले आहे.

कोरोना काळात जम्बो कोविड सेंटरमध्ये वैद्यकीतय साहित्य, इतर आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यात आला होता. यासाठी पुरवठादार, कंत्राटरादाराना पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याकडून कार्यादेश दिले होते. यामध्ये नियमबाह्य झाल्याचा आरोप आहे.

मुंबई महापालिकेचे सह आयुक्त विजय बालमवार यांची पालिकेच्या मध्यवर्ती खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोविड घोटाळा प्रकरणी ईडीचे अधिकारी मध्यवर्ती खरेदी खात्याची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे सहआयुक्त बालमवार यांना आता या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. डी छापेमारीने पालिकेतील

bmc election
Accident : मित्राच्या लग्नासाठी निघालेले तीन युवक अपघातात ठार; पेंडगाव शिवारात वाहन पलटी

कोविड काळातील भ्रष्टाचाराची चौकशी आधी कॅगकडून सुरु झाली. त्यानंतर गेल्या जानेवारी महिन्यांत पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना अंमलबजावणी संचालयाने (ईडी) चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. आता मागील दोन दिवसांपासून कारवाईचा धडाका सुरु झाला आहे.

ईडीने पालिकेच्या संबंधित काही अधिका-यांच्या घरी व कार्यालयावर छापे टाकून चौकशी सुरु केली आहे. काही बुधवारी (ता. 21) पालिकेतील काही वरिष्ठ अधिका-यांच्या घरी छापे टाकून चौकशी केली. त्यानंतर गुरुवारी (ता. 22) भायखळा येथील पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खाते येथे ईडीच्या अधिका-याने छापे टाकले. ही कारवाई यापुढेही सुरु राहण्याची शक्यता आहे.

ठाकरे सरकारच्या काळात हा घोटाळा झाल्याचा आरोप असल्यामुळे त्यांचे निकटवर्तीय असलेल्या कंत्राटदारांसह तत्कालीन अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवरही ईडीने छापे टाकले आहेत. यात आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यासह मुंबई मनपाचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त व आताचे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांची झडती घेण्यात आली. शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.