Mumbai Crime: मोबाईल रिपेअरिंगसाठी 500 रुपये मागितल्यानं खून; विचित्र घटनेत दोन भावांना अटक

किरकोळ कारणांवरुन थेट टोकाचं पाऊल उचलण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
Two thieves stealing mobiles and laptops from Pimpri have been nabbed by Crime Branch Unit two
Two thieves stealing mobiles and laptops from Pimpri have been nabbed by Crime Branch Unit two
Updated on

मुंबई : मोबाईल रिपेअरिंगसाठी ५०० रुपये मागितल्यानं एका व्यक्तीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन भावांना अटक केली आहे. या प्रकरणाप्रमाणं किरकोळ कारणांवरुन थेट टोकाचं पाऊल उचलण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. (Mumbai Crime Murder after demanding Rs 500 for mobile repairing two brothers arrested)

पोलिसांच्या माहितीनुसार, "शाबाद चांद मोहम्मद खान आणि शानू खान अशा दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून हे दोघेही भाऊ आहेत. त्यांच्यावर नझीम खान नामक व्यक्तीचा ५०० रुपयांसाठी खून केल्याचा आरोप आहे"

Two thieves stealing mobiles and laptops from Pimpri have been nabbed by Crime Branch Unit two
Chinchwad ByElection: "राहुल कलाटेंच्या बंडखोरीमागं खरा सूत्रधार..."; अजितदादा मात्र निश्चिंत

नक्की काय घडलं?

नझीम खान याचा मोबाईल फोन शाबाद खान याच्या हातातून खाली पडल्यानं फुटला. फोनचं नुकसान झाल्यानं नझीमनं याची नुकसान भरपाई शाबादकडं मागितली. फोनच्या रिपेअरिंगसाठी १००० रुपये खर्च येणार होता. यांपैकी फक्त ५०० रुपयेच शाबादनं नझीमच्या बायकोकडं दिले. रिपेअरिंगच्या उर्वरित खर्चाची मागणी नझीमनं शाबादकडं केली. यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि तो इतका विकोपाला गेली की त्याची परिणीती नझीमच्या हत्येमध्ये झाली, असं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.