Mumbai Crime News : मुंबईत धक्कादायक प्रकार! मृतदेहासोबत कुटुंबाने घालवले 10 दिवस; हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं...

Saki Naka Hotel News : मुंबईतल्या साकीनाका येथील हॉटेलमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कुटुंबातील चार जणांनी तब्बल दहा दिवस मृतदेहासोबत घालवले. मृत महिलेच्या मुलाने शनिवारी रात्री या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
Mumbai Crime News
Mumbai Crime News esakal
Updated on

मुंबईः मुंबईतल्या साकीनाका येथील हॉटेलमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कुटुंबातील चार जणांनी तब्बल दहा दिवस मृतदेहासोबत घालवले. मृत महिलेच्या मुलाने शनिवारी रात्री या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नसीमा युसूफ हलाई (वय ४८) यांचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला होता. नसीमा यांच्या पुतण्याने नसीमाचा मुलगा यासिनला मेल पाठवून मृत्यूची बातमी दिली होती.

Mumbai Crime News
Lok Sabha Election: लोकसभेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; शिंदे गटाला 12 तर अजित पवार गटाला किती जागा मिळणार?

साकीनाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमटे म्हणाले की, मृत नसीमा यांचा मुलगा युकेहून आल्यानंतर आम्हाला मृत्यूची बातमी कळाली. त्यानंतर आमच्या टीमने हॉटेलच्या खोलीत जावून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. शवविच्छेदनासाठी मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

मृत्यूचे नेमके कारण आणि कुजलेल्या मृतदेहासोबत कुटुंबाचे वास्तव्य, याचा तपास पोलिस करीत आहेत. साकीनाका येथील हॉटेलमध्ये मृतदेहासोबत नसीमाचे वडील अब्दुल करीम सुलेमान हलाई (वय ८२), नसीमा यांची २६ वर्षांची मुलगी, अब्दुल यांचा मुलगा आणि नातू हे सदस्य १० दिवस राहात होते.

Mumbai Crime News
Yodha Teaser: हायजॅकर्ससोबत लढणार सिद्धार्थ मल्होत्रा, दिशाचा दमदार अंदाज; 'योद्धा'चा जबरदस्त टीझर रिलीज

हॉटेलच्या रुममध्ये मृतदेह लपवून ठेवल्याचं कुटुंबाने कुणालाही कळू दिलं नाही. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनाही याची भनक लागू दिली नाही. कुटुंबातील सदस्य रुमचा दरवाजा बंद ठेवायचे. कुजलेल्या मृतदेहाची दुर्गंधी रोखण्यासाठी त्यांनी नेमकं काय केलं, याचा शोध पोलिस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार, आई आणि मुलगी दोघीही जोगेश्वरी येथे रहायच्या. नसीमाचं तिच्या पतीसोबत भांडण झाल्यानंतर २१ महिन्यांपूर्वी त्यांनी घर सोडलं होतं. तेव्हापासून कुटुंबातील पाच जण वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये रहायचे. मृत्यूचं नेमक्या कारणाचा पोलिस शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()