Mumbai Crime News: कोण आहे गँगस्टर छोटा शकीलचा शूटर?, २५ वर्षांनंतर ठाण्यात अटक

Mumbai Crime News
Mumbai Crime News
Updated on

Mumbai Crime News: छोटा शकील टोळीचा शूटर लईक अहमद फिदा हुसैन शेख (५०) याला पायधोनी पोलिसांनी का (२८ जुलै) रोजी अटक केली. ठाणे रेल्वे स्थानकाजवळून त्याला करण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीच्या सदस्याच्या हत्येप्रकरणी शेख आरोपी आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

हुसैन शेख हा छोटा शकील टोळीसाठी काम करत होता, असे मुंबई पोलिसांनी सांगितले. त्याच्या साथीदारांनी १९९७ मध्ये छोटा राजन टोळीच्या सदस्याची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्या प्रकरणी न्यायालयाने शेखला फरार घोषित केले होते.

तो मुंब्रा, ठाणे येथे राहत असल्याची माहिती मिळाली. यानंतर आम्ही त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. घटनेच्या वेळी तो दक्षिण मुंबईतील डोंगरी भागात राहत होता, असे पोलिसांनी सांगितले. (Mumbai Crime News)

Mumbai Crime News
Mumbai Crime : दिल्ली-मुंबई इंडिगो फ्लाईटमध्ये प्रवासी महिलेशी लैंगिक अत्याचार प्रकरणी 47 वर्षीय प्राध्यापकाला अटक

छोटा शकील हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सर्वात जवळचा असल्याचे बोलले जात होते. एकेकाळी तो दक्षिण मुंबईतील नागपाडा येथे ट्रॅव्हल एजन्सी चालवत होता. कसेबसे त्याची दाऊदशी मैत्री झाली आणि त्याने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला आणि तो दाऊदचा सर्वात खास बनला. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात छोटा शकीलचे नाव समोर आले होते.

दाऊद सोबत त्याने या हल्ल्याची योजना आखली असल्याचे सांगण्यात येत आहे. छोटा राजनवरील हल्ल्यामागे छोटा शकीलचा हात असल्याचेही बोलले जात आहे. २००४ मध्ये पोटा कोर्टाने दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांना ISI कट प्रकरणात दोषी घोषित केले होते.

Mumbai Crime News
Nirmala Sitharaman : ‘आयएफएससी’वर नोंदणीची सुविधा, जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्याची संधी - निर्मला सीतारामन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()