गेल्या काही दिवसांमध्ये महिलावर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ४ वर्षीय शाळकरी मुलीवर त्याच शाळेच्या वॉचमनने लैगिंग अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मालाडच्या मालवणी परिसरातील अंबुजवाडी येथील ही घटना आहे. आरोपी वॉचमनला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अन्सारी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. ४ वर्षीय चिमुकली नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. सकाळच्या सुमारात आरोपी मोहम्मद अन्सारीने संधी साधून मुलीवर अत्याचार केला. १९ डिसेंबरच्या सकाळी ९ ते १२ दरम्यान ही घटना घडली. आरोपी अल्पवयीन मुलीला एका क्लासरुममध्ये घेऊन गेला तिथे त्याने गैरकृत्य केल्याची माहिती समोर येत आहे.(Latest Marathi News)
घटनेनंतर त्रास होऊ लागल्याने मुलगी रडत होती. मुलीच्या पालकांनी तिच्या त्यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यावेळी तिच्या पालकांना मोठा धक्का बसला.
पालकांनी त्यानंतर मालाडच्या मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पालकांच्या तक्रारीवरुन आरोपी मोहम्मद अन्सारी विरोधात ३७६, ३५४, भादवी कलमांतर ४, ८, १२ पोस्को अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.