डोंबिवलीतून भारत गॅस कंपनीचे 9 सिलेंडरची चोरी

तसेच 27 सिलेंडरची रक्कम डिलिव्हरी बॉयने लांबविली
mumbai crime news Theft of 9 cylinders of Bharat Gas Company from Dombivali
mumbai crime news Theft of 9 cylinders of Bharat Gas Company from DombivaliSakal
Updated on

डोंबिवली : घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ होत सिलिंडरचा दर हा हजाराच्या घरात गेला आहे. गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याने त्याची चोरी करण्यासही आता चोरट्यांनी सुरुवात केली आहे. डोंबिवलीत अशाच दोन घटना समोर आल्या असून एका गॅस एजन्सीत काम करणाऱ्या डिलिव्हरी ब़ॉयने चक्क 9 सिलेंडर चोरले आहेत. तर अन्य एका गॅस एजन्सीत काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयने 27 गॅस सिलेंडरची रोख रक्कम म्हणजेच 27 हजार रुपयांवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

डोंबिवली पूवेतील पेंढरकर कॉलेजजवळील एमआयडीसी फेज 1 मध्ये जयशक्ती भारत गॅस व शिवशक्ती भारत गॅस एजन्सी आहेत. 7 ते 9 मे या कालावधीत या घटना घडल्या आहेत. जयशक्ती भारत गॅस एजन्सीमध्ये एजन्सी मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले लखन सोनवणे यांनी याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जयशक्ती एजन्सीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा हनुमान बिश्नोई हा 7 मे ला सकाळी 10 च्या सुमारास गोडावून मधील 25 भरलेले गॅस सिलेंडर घेऊन एकटाच कोळेगाव परिसरात डिलिव्हरीसाठी गेला. तेथून दुपारी परतत त्याने गाडी गोडावूनला पार्क करत काही एक न सांगता तेथून निघून गेला. त्यानंतर मॅनेजर लखन यांनी गाडी चेक केली असता त्यात 9 भरलेले सिलेंडर कमी आढळून आले. तसेच हमुमान याचा फोन देखील बंद येत असल्याने त्याच्याविरोधात 22 हजार रुपये किंमतीचे 9 सिलेंडर चोरल्याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच याच एजन्सीच्या बाजूला असलेल्या शिवशक्ती भारत गॅस गोडावून मधून 9 मेला अशाच पद्धतीने श्रवण कुमार बिश्नोई हा डिलिव्हरी बॉय देसलेपाडा भागात डिलिव्हरीसाठी एकूण 27 भरलेले सिलेंडर घेऊन गेला होता. त्याने रिकामे 27 सिलेंडर गोडावून मध्ये जमा करुन त्याची रोख रक्कम 27 हजार रुपये व एका रेग्युलेटरची किंमत 295 रुपये असा एकूण 27 हजार 295 रुपयांची रोख रक्कम घेऊन पळून गेला आहे. मॅनेजर लखन यांच्या तक्रारीवरुन दोन्ही डिलिव्हरी बॉय विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.