Mumbai News: प्लास्टिक जप्तीतून १३ लाखांची दंडवसुली; त्यानुसार एकल वापराच्या म्हणजेच...

राज्य सरकारने महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवणूक) अधिसूचना २०१८ प्रसिद्ध केली.
mumbai crime police investigation police case
mumbai crime police investigation police caseSakal
Updated on

Mumai Update News : महापालिकेने केलेल्या प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाईत पाच दिवसांत सहा हजार १८ ठिकाणी छापे मारून ५९३.३०५ किलो प्लास्टिक जप्त केले आहे. या कालावधीत १३ लाखांचा दंड वसूल केला असून १६८ जणांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

राज्य सरकारने महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवणूक) अधिसूचना २०१८ प्रसिद्ध केली.

त्यानुसार एकल वापराच्या म्हणजेच सिंगल यूज प्लास्टिक वस्तू उत्पादन, वापर, वाहतूक, वितरण, घाऊक आणि किरकोळ विक्री आणि साठवणूक यावर बंदी घातली आहे. केंद्र सरकारनेही एकल वापराच्या प्लास्टिकबाबत १२ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केली होती.

mumbai crime police investigation police case
Mumbai Trans Harbour : तुर्भे स्थानकात तांत्रिक बिघाड : ट्रान्सहार्बर प्रवाशांचे झाले हाल!

पालिका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलिस खाते मिळून ही कारवाई करीत आहे. सजावटीसाठी वापरले जाणारे प्लास्टिक, थर्माकोल, मिठाईचे बॉक्स, निमंत्रण कार्ड, सिगारेट पाकिटांना असलेली प्लास्टिकची आवरणे यांच्यासह कानकोरणी,

फुग्यांच्या काड्या, प्लास्टिकचे झेंडे, आईस्क्रीमच्या कांड्या आणि प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनरला (१०० मायक्रॉनपेक्षा कमी) बंदी आहे. याविरोधातील मोहीम २५ ऑगस्टपासून अधिक तीव्र करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

mumbai crime police investigation police case
Pune: पुणे-दौंड-पुणे हा प्रवास होणार आणखी वेगवान, रेल्वेचा ताशी वेग १३० किमी

२५ हजारांपर्यंत दंड उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते यांनी नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम २००६ च्या कलम ९ नुसार पहिल्या गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये आणि त्यानंतरच्या गुन्ह्यांसाठी तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास व २५ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()