मुंबई - मुंबईत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ३२ वर्षीय तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणाने पोलीस ठाण्यात अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.
अंगावर पेट्रोल ओतून घेणारा तरुण लातूरचा रहिवासी असून त्याचे नाव अनिल शिंदे आहे. त्याने थेट पोलिस ठाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच गोंधळ उडाला होता. अरूण निटुरे नावाच्या इसमाने नोकरी लावण्याचे अमिष दाखवून आपल्याकडून पैसे घेतले. मात्र त्याने ते परत केले नाहीत, असं अनिल शिंदे याचं म्हणणं आहे. यातून त्याने पोलीस ठाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं समजतं.
दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी अनिल शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.