Mumbai Crime: सॉफ्टवेअर इंजिनिअरला दाखवले ऑनलाइन नोकरीचे आमिष, दोन महिलांनी केली 40 लाखांची लूट

Kalyan Crime: पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गु्न्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला आहॆ.
: सॉफ्टवेअर इंजिनिअरला दाखवले ऑनलाइन नोकरीचे आमिष, दोन महिलांनी केली 40 लाखांची लूट
Mumbai Crimesakal
Updated on

Thane Crime: ऑनलाइन नोकरीचे आमिष दाखवित कल्याण मधील सॉफ्टवेअर इंजिनिअरला दोन महिलांनी 40 लाखाला गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

आठवड्याभराच्या कालावधीत ही फसवणूक झाली असून याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिक सिंग (वय 25) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव असून प्रिया व अविका मिश्रा या गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत.

: सॉफ्टवेअर इंजिनिअरला दाखवले ऑनलाइन नोकरीचे आमिष, दोन महिलांनी केली 40 लाखांची लूट
Mumbai MBMC: 5 वर्षांचा चिमुकला खेळायला गेला अन् पुन्हा घरी आलाच नाही; जैव-गॅस प्रकल्पाच्या खड्ड्यात पडून मृत्यू

कल्याण पूर्वेत राहणारा प्रतीक हा साॅफ्टवेअर इंजिनिअर आहे. साधारण पंधरा दिवसापूर्वी प्रतिक घरी असताना प्रिया आणि अविका या दोन महिलांनी मोबाईलच्या माध्यमातून त्याच्याची संपर्क साधला. त्याला बोलण्यात गुंतवून ठेवून ऑनलाईन माध्यमातून अर्धवेळ नोकरी मिळवून देण्याचे आमिष प्रतीकला दाखवले.

घरबसल्या अर्धवेळ नोकरी मिळते म्हणून प्रतिकने या महिलांच्या संपर्काला प्रतिसाद दिला. या महिलांनी प्रतिकला व्हाॅट्सप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क करून त्याला एक लिंक पाठवली. या लिंकच्या माध्यमातून एक गुंतवणुकीचे साधन पाठवून त्या माध्यमातून प्रतिकला टप्प्याने गुंंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवणूक साधनाचा गुणांक वाढेल त्याप्रमाणे तुम्हाला अधिकचा नफा मिळेल असे आश्वासन प्रिया, अविका यांनी प्रतिकला दिले.

: सॉफ्टवेअर इंजिनिअरला दाखवले ऑनलाइन नोकरीचे आमिष, दोन महिलांनी केली 40 लाखांची लूट
Mumbai Mega Block : रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

अशाप्रकारे गोडबोलून या भामट्या महिलांनी प्रतिकच्या कल्याण पूर्वेतील सूचकनााका येथील एचडीेएफसी बँकेतून स्वतःच्या बँँक खात्यात 40 लाख 40 हजार 300 रूपये गुंतवणूक वळते करून घेतले. गुंतवणुकीवर तातडीने नफा मिळत असल्याने प्रतिक त्या नफ्याची मागणी महिलांकडे करू लागला.

परंतु, त्या महिलांनी प्रतिकच्या संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. आपणास अर्धवेळ नोकरी नाहीच पण गुंतवणूक केलेल्या रकमेवर अधिकचा परतावा मिळत नाही. गुंतवणूक केलेली मूळ रक्कम महिला परत करत नाहीत. हे लक्षात आल्यावर प्रतिकला आपली फसवणूक या महिलांनी केले असल्याचे निदर्शनास आले.

: सॉफ्टवेअर इंजिनिअरला दाखवले ऑनलाइन नोकरीचे आमिष, दोन महिलांनी केली 40 लाखांची लूट
Mumbai - Ahmedabad National Highway: मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग चिखलमय, दोनचाकी वाहनांना धोका!

त्याने त्वरित कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी दोन महिलांविरोधात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गु्न्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला आहॆ.

: सॉफ्टवेअर इंजिनिअरला दाखवले ऑनलाइन नोकरीचे आमिष, दोन महिलांनी केली 40 लाखांची लूट
Mumbai Ice Cream Case: मुंबईमधील आईस्क्रीममध्ये सापडलेलं मानवी बोट कोणाचं? पुण्याच्या कनेक्शनचा पोलिसांनी केला खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.