Mumbai Crime: टेम्पोच्या बॅटऱ्या चोरून विक्रीला आले, हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या

Kalyan Police : कल्याण गुन्हे शाखेची कारवाई दोघांना अटक, पुढील तपास सुरू आहे.
टेम्पोच्या बॅटऱ्या चोरून विक्रीला आले, हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या
Mumbai Crime:sakal
Updated on

Tilaknagar Police Station: टेम्पोच्या चोरलेल्या बॅटऱ्या विकण्यासाठी आला, गुन्हे शाखेला खबर लागताच पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली आहे.

सुहास उर्फ चिंग्या पाईकराव (वय 21) व रॉकी उर्फ मोनू चव्हाण (वय 18) अशी अटक आरोपींचे नाव असून त्यांच्याकडून 8 हजार रुपये किंमतीच्या 3 बॅटऱ्या हस्तगत केल्या आहेत. कल्याण गुन्हे शाखेने सदर आरोपींना टिळकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे.

कल्याण गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना बुधवारी गुप्त बातमीदार यांच्या मार्फत माहिती मिळाली की सुहास उर्फ चिंग्या पाईकराव आणि रॉकी उर्फ मोनू चव्हाण यांनी टेम्पोच्या गाड्यांचे मोठ्या बॅटऱ्या कोठून तरी चोरून आणल्या असून त्या विकायला कल्याण शीळ रोड येथील प्रीमियर कॉलनी मैदान जवळ दुपारी 3 ते 4 दरम्यान येणार आहेत असे सांगितले.

माहितीची शहानिशा करत गुन्हे शाखा युनिट -3 कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, संतोष उगलमुगले, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक दत्ताराम भोसले, पोलीस हवालदार बालाजी शिंदे, गुरुनाथ जरग, मिथुन राठोड, दिपक महाजन, बोरकर यांच्या पथकाची स्थापना केली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचला. दोघे संशयित रिक्षातून उतरले तसेच त्यांच्याकडे दोन गोण्या मध्ये काही तरी जड वस्तू असल्याचे दिसून येताच पोलिसांनी घेराव घालत त्यांना पकडले.

सुहास व रॉकी हे दोघेही डोंबिवली शेलार नाका येथे राहणारे आहेत. पोलिसांना त्यांच्याकडील गोणीत अमरोन कंपनीच्या दोन बॅटऱ्या व एक्साइड कंपनीच्या एक बॅटरी असे एकूण 3 मोठ्या बॅटऱ्या मिळून आल्या. या बॅटऱ्या विक्री करण्याकरिता आलो असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. शेलार नाका येथील टेम्पोच्या बॅटरी चोरल्याचे देखील कबूल केले.

टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल असून सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेने आरोपी व मुद्देमाल टिळकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. याचा पुढील तपास टिळकनगर पोलीस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.