Mumbai Crime : रिकामे सिलेंडर भंगारात विकणार तोच पोलिसांची पडली नजर; आरोपी अटकेत

Crime news
Crime newsesakal
Updated on

डोंबिवली - घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या एका एजन्सीच्या दारात विचित्र घटना मंगळवारी रात्री घडली आहे. एजन्सी बाहेरील एका ट्रकमध्ये रिकामे सिलिंडर ठेवण्यात आले होते. यातील काही सिलेंडर चोरुन ते भंगारात विकून पैसे कमविण्याचा चोरट्याचा उद्देश होता. मात्र त्याआधीच गस्तीवर असलेल्या कोळसेवाडी पोलिसांची त्याच्यावर नजर पडली आणि त्याच्या हातात पोलिसांच्या बेड्या पडल्या.

Crime news
Mumbai News : डोंबिवलीत खेकडे पकडण्यासाठी गेला अन् परतलाच नाही! तलावात...

याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रसिक पठाण असे अटक आरोपीचे नाव आहे. कल्याण पूर्वेतील मलंगगड रोड परिसरात एक खासगी गॅस एजन्सी आहे. या एजन्सीमध्ये रिकामे झालेले घरगुती गॅस सिलेंडर टाक्या या ट्रकमध्ये भरुन ठेवण्यात आल्या होत्या.

या टाक्या मध्यवर्ती पुरवठा केंद्रात नेण्यात येणार होत्या. सिलिंडर भरल्यानंतर ट्रकची मागील बाजू ही बंदिस्त करण्यात आली. ट्रक चालक हा जेवण करण्यासाठी गेला असता रसिक याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने ट्रकची मागील बाजू उघडून त्यातील दोन सिलेंडर घाईने ट्रकमधून उतरविले. हे सिलेंडर भंगारात विकून त्यातून पैसे रसिकला कमवायचे होते. परंतु याचवेळी कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस हे या रस्त्यावर गस्त घालित होते.

Crime news
Supriya Sule: सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांकडे केली मोठी मागणी

गस्त घालत असताना त्यांना रात्रीच्या वेळेस गॅस एजन्सीच्या बाहेर एक तरुण संशयास्पद रित्या हालचाली करत असल्याचे आढळून आले. त्यांनी त्याला हटकत एवढ्या रात्रीच्या वेळेस तू येथे काय करतो अशी विचारणा केली. त्यानं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना दिली. परंतू पोलिसांनी त्याची कसून चौकशी करताच त्याने ट्रकमधील रिकाम्या सिलिंडरमधील दोन सिलिंडर आपण खाली उतरविले आहेत. ते आपण भंगारात विकणार आहोत, असे सांगितले.

चोरीची कबुली देताच पोलिसांनी आरोपी रसिकला पोलीस ठाण्यात आणत त्याच्या विरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला. रसिकला आणखी एका साथीदाराने चोरीसाठी मदत केली असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.