रोहिणी गोसवी : सकाळ वृत्तसेवा
मुंबई : महसूल संचालनालयाच्या (Directorate of taxes) गुप्तचर विभागानं (intelligence department) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विामनतळावरुन (MCSM International Airport) जवळपास 42 कोटींचे मोबाईल फोन जप्त (Mobile Phone seized) केले आहेत. यात 3646 आयफोन्सचा समावेश आहे.
महसूल गुप्तचर विभागाला मोबाईलचा मोठा साठा स्मगल केला जात असल्याची माहिती त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्यानुसार आयात होणाऱ्या कन्साईनमेंटसवर बारकाईनं लक्ष दिलं जात होतं. त्यातच हॉंगकॉंगहून आलेल्या एयर कार्गोतील कन्साईंनमेंट तपासल्या जात असताना 'मोबाईल सीमकार्ड' असं लिहिलेली एक कन्साईनमेंट दिसून आली, या कन्साईनमेंटवर अधिकाऱ्यांना संशय आला.
कागदोपत्री या कन्साईंनमेंटमध्ये मोबाईलचे सीमकार्ड असल्याची नोंद करण्यात आली होती. त्याची नीट तपासणी केली असता, त्यात सीमकार्ड नसून मोबाईल फोन असल्याचं उघड झालं. कागदोपत्री मोबाईल फोन्सचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नव्हता, तसंच त्याची इम्पोर्ट ड्युटीही भरण्यात आलेली नव्हती. कागदोपत्री मालाची किंमत 80 लाख असल्याचं दाखवण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात त्याची किंम 42 कोटींच्या घरात आहे.
जप्त केलेल्या कन्साईनमेंटमध्ये 2245 iphone 13 pro, 1401 iphone 13 pro Max, 6 google pixel 6 pro, आणि 1 apple smart watch अशा मुद्देमालाचा समावेश आहे. Apple 13 सप्टेंवर 2021 मध्ये भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला, त्याची किंमत साधारणपणे 70 हजारांपासून सुरु होते, त्यातलं हाय एंड मोबाईलची किंंमत जपळपास 1 लाख 80 हजार इतकी आहे. महागड्या आणि स्टेटस सिंम्बॉल समजल्या जाणाऱ्या आयफोनवर परदेशातून येताना मोठी ड्युटीही भरावी लागते. महसूल संचालनालयाची ही आत्तापर्यंतची मोठी कारवाई मानली जात आहे, या कारवाईमुळं अशा स्मगलींगला मोठ्या प्रमाणात आळा बसेल असा विश्वास महसूल गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.