मुंबई : अंधेरी, विलेपार्ले,जोगेश्वरी परीसरात मॅनहोल्सची झाकणे (Manhole Dakan robbery) चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. पहाटेच्या वेळी रिक्षातून येऊन ही चोरी केली जात आहे. एमआयडीसी (MIDC) परीसरातील अशीच चोरी सीसीटीव्ही मध्ये (CCTV Footage) कैद झाली असून या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा (Police FIR) नोंदवला आहे.
मुंबईत मैलावाहीन्याचे भुमिगत जाळे आहे.या वाहीन्याच्या नियमीत तपासणी आणि स्वच्छतेसाठी ठराविक अंतरावर मॅनहोल्स तयार करण्यात आले आहे.हे मॅनहोल्स 12 ते 25 फुटा पर्यंत खोल असतात.त्यामुळे सुरक्षेसाठी या मॅनहोल्सवर मजबूत लोखंडी झाकणे बसवली जाता.या झाकणाचे बाजार मुल्य 12 हजार रुपयां पर्यंत आहे.तर,भंगरातही याची किंमत काही हजारात आहे.त्यामुळे या मॅनहोल्सच्या झाकण्याचे चोरीचे प्रकार नेहमीच घडत असतात.खासकरुन भुरटे चोर,गर्दुले अशा प्रकारची चोरी करत असल्याचे आढळले आहे.
पालिकेच्या के/पूर्व विभाग अंतर्गत अंधेरी (पूर्व), विलेपार्ले (पूर्व) व जोगेश्वरी (पूर्व) या भागात गेल्या काही दिवसात 20 च्या आसपास झाकणांची चोरी झाली आहे.एमआयडीसी परीसरातील चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे.यानुसार पालिकेने एमआयडीसी आणि सहार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे.
दुसऱ्यांच्या जिवावर बेतणारी चोरी
ही चोरी सामान्य नागरीकांच्या जिवावर बेतू शकते. मॅनहोलमध्ये एखादी व्यक्ती पडून अथवा धावत्या वाहनांचे चाक अडकून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.असे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.त्यामुळे मॅनहोलवर झाकण नसल्याचे आढळताच नवीन झाकण लावण्याची कार्यवाही प्रशासनाकडून त्वरित करण्यात आली. मात्र, झाकण वारंवार गायब होत असल्याने हा चोरीचा प्रकार असल्याचे लक्षात आले. असे सांगण्यात आले.
अवघ्या तीन सेकंदात चोरी
मुख्यत: पहाटेच्या वेळी ही चोरी होते.एमआयडीसी येथील चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे.यात,पहाटे एक रिक्षा आली.त्यांनी परीसरात एक फेरी मारली.रस्त्यावर कोणी नाही हे पाहून मॅनहोसच्या बाजूला ही रिक्षा थांबवली.आजूबाजूचा अंदाज घेऊन दोन व्यक्ती रिक्षातून उतरल्या.त्यांनी झाकण उचलून रिक्षात ठेवले.रेकी करण्यासाठी या चोरांनी एक मिनीटाचा कालावधी घेतला.तर,चोरी अवघ्या 30 सेकंदात केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.