मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; वर्षभरात जप्त केले ९० कोटींचे ड्रग्ज

Anti narcotic cell Mumbai
Anti narcotic cell Mumbaisakal media
Updated on

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अंमली पदार्थ विरोधी पथकानं (Anti narcotics cell) गेल्या वर्षभरात म्हणजेच जानेवारी 2021 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत 102 केसेसमध्ये 90 कोटींपेक्षा जास्त किंमत असलेले अंमली पदार्थ जप्त (ninety crore rupees Drug seized) केलेत. यात 15 किलो हेरॉइन 9 ठिकाणी छापे टाकून पकडण्यात आलं आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 45 कोटी 23 लाख 10 हजार इतकी आहे. त्यानंतर 13 कोटी 33 लाख 65 हजारांचं एमडी ड्रग जप्त करण्यात आलं, जे एकूण 40 ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये मिळालं.

Anti narcotic cell Mumbai
डोंबिवली : परदेशातून आलेल्या 'त्या' रुग्णांचा अहवाल प्रतिक्षेतच!

10 कोटी 67 लाख 25 हजार रुपयांचं 3.66 किलो कोकेन 10 ठिकाणी छापे टाकून पकडण्यात आलं. तर 35 किलो चरस वर्षभरात जप्त करण्यात आलं आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 8 कोटी 30 लाख 75 हजार इतकी आहे. दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये 189 एलएसडी पेपर डॉट जप्त करण्यात आले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारतली किंमत 18 लाख 90 हजार इतकी आहे.

तीन वर्षातली उच्चांकी कारवाई

गेल्या तीन वर्षांच्या 2021 मध्ये करण्यात आलेली कारवाई ही सगळ्यात जास्त आहे, यावर्षी 102 केसेस रजीस्टर करण्यात आल्या आहे, ज्यात एकूण 90 कोटींपेक्षा जास्त अमली पदार्थ जप्त करण्यात आले, ज्या 2020 मध्ये फक्त 44 केसेेस रजिस्टर करण्यात आल्या होत्या ज्यात 22.24 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. तर 2019 मध्ये 70 केसेस रजिस्टर करण्यात आल्या होत्या, ज्यात 25 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

नष्ट करण्याची पद्धत

जप्त करण्यात आलेले अमली पदार्थांचा दंडाधिकाऱ्यांसमोर पंचनामा करण्यात येतो, त्यानंतर पंचांच्या साक्षीनं जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात येतात. नोव्हेंबरमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकानं एका वकिलाचा ड्रग्ज बनवण्याचा कारखाना उद्धवस्त केला होता, ज्यात जवळपास दोन कोटींचं एमडी ड्रग जप्त करण्यात आलं होतं. कांदीवलीतूनही 10 लाखाचं एमडी ड्रग तर दुसऱ्या एका छाप्यात 2 कोटी रुपयांचं चरस जप्त करण्यात आलं होतं.

"अंमली पदारथ मुक्त मुंबई या ध्येयानं मुंबई पोलिसांचं अंमली पदार्थ विरोधी पथक सातत्यानं कम करतंय. अमली पदार्थांचा विळखा कमी करायचा असेल तर फक्त पेडलर्स नाही, तर त्यंची सप्लाय चेन उध्द्वस्त करण्याचा प्रयत्न हे पथक करत आहे. त्यामुळंच गेल्या काही वर्षांमध्ये अंमली पदीर्थ विरोधी पथकाच्या कामाला वेग आला आहे. कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. "

- दत्ता नलावडे, पोलीस उपायुक्त, अंमली पदार्थ विरोधी पथक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.