रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा
मुंबई : कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीला (Suresh pujari) भारतात आणल्यानंतर त्याच्यावर आणखी गुन्हे दाखल (police complaint) व्हायला सुरुवात झाली आहे. मुंबईतल्या वाकोला पोलीस स्टेशनमध्ये (vakola police station) तक्रार दाखल झाली आहे. सुरेश पुजारीनं 22 मार्च 2021 मध्ये एका कंपनीच्या संचालकाला फोनवरुन खंडणीसाठी फोन केला होता.
एकदा प्रतिसाद न मिळाल्यानं त्यानं 3-4 वेळा फोन केला होता. पैसे दिले नाहीत तर जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसात तक्रार केली तर जीवाचं काही बरं वाईट होईल या भितीनं तक्रारदार इतके दिवस गप्प होता. पण आत्ता सुरेश पुजारीला अटक झाल्यानंतर त्यानं पोलिसात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याच पुढील तपास मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे..
सुरेश पुजारीवर मुंबईत 23 गंभीर गुन्ह्यांची नोंद
सुरेश पुजारीला फिलीपीन्समधून अटक केल्यानंतर त्याचा ठाणे एटीएसला देण्यात आला होता. एटीएसनं त्याला ठाणे कोर्टात हजर केल्यानंतर त्याला 25 डिसेंबरपर्यंत एटीएस कोठडी देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.