Mumbai Crime : लहान मुलीचे हातपाय बांधले तोंडात कापडाचा गोळा कोंबला...नंतर घरात केली चोरी

डोंबिवलीतील धक्कादायक घटना; दोन चोरटे घरात चोरीच्या उद्देशाने शिरले
mumbai crime update theft case captured in cctv shocking reveal girl tied and made robbery at home
mumbai crime update theft case captured in cctv shocking reveal girl tied and made robbery at homeSakal
Updated on

डोंबिवली - डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन चोरटे घरात चोरीच्या उद्देशाने शिरले. घरात एकट्या असलेल्या मुलीचे हातपाय बांधून तिच्या तोंडात त्यांनी कापडाचा बोळा कोंबला.

त्यानंतर घरात शोध घेत रोख रक्कम व मंगळसूत्र चोरून नेले आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मानपाडा पोलीस ठाण्यात सदानंद सिंह यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार डोंबिवली मधील नांदिवली टेकडी परिसरात ते राहतात. रविवारी संध्याकाळी 6 ते 7 च्या दरम्यान त्यांची लहान मुलगी घरात एकटीच होती.

यावेळी तोंडाला रूमाल बांधलेले दोन अनोळखी इसम हे सदानंद यांच्या घरात घुसले. घरात शिरताच चोरट्यानी त्यांच्या मुलीचे हात बांधून आणि तोंडात कापडाचा बोळा कोंबला. नंतर घरात शोध सुरू केला.

बेडरूममधील कपाटात ठेवलेली 40 हजार रुपये रोख रक्कम आणि देवघराच्या ड्राव्हरमधील डब्यात ठेवलेले सोन्याचे मंगळसुत्र चोरी करून ते पसार झाले. हे दोन्ही चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

चोरट्यानी मुलीला काही ही केलेले नसल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असला तरी, घरात मूल एकटे ठेवून कामावर जाणाऱ्या पालकांच्या काळजात मात्र धस झाले आहे. चोरीच्या अशा वाढत्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त घातली पाहिजे अशी मागणी नागरिक करु लागले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()