मुंबई : आझाद मैदान मेट्रो स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून प्रवाशांना ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय रेल्वे आणि राज्य सरकारने घेतला आहे. हा भुयारी मार्ग तब्बल ३५० मीटर लांबीचा आणि १८ मीटर रूंदी असणार आहे.
प्रवाशांना बाहेर न येता जमिनीखालून थेट लोकल स्थानक गाठता यावे, यासाठी मेट्रो-३ रेल्वे मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.पहिला टप्पा आरे ते बीकेसी उत्तर असून तो डिसेंबर २०२३ ला सुरू होणार आहे. तर दुसरा टप्पा बीकेसी दक्षिण ते कफ परेड असेल. डिसेंबर २०२४ मध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातच सीएसएमटी मेट्रो स्थानक आहे. हे आझाद मैदानातून भुयारी मार्गाने थेट सीएसएमटी स्थानकांवर पोहचता येणार आहे.
त्यासाठी सीएसएमटीपासून हिमालय पूल आणि पुढे आझाद मैदान असा तब्बल ३५० मीटर लांबीचा आणि १८ मीटर रूंदीचा भुयारी मार्ग उभारण्याची योजना रेल्वे आणि राज्य सरकारने आखली आहे. या भुयारी मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे येथील हजारो प्रवाशांना सीएसएमटी स्थानकात आणि मेट्रो स्थानकात लगेच पोहोचता येणार आहे. याचा खर्च रेल्वे आणि राज्य सरकार संयुक्तपणे करणार आहे.
- भुयारी मार्ग सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १ पासून सुरू होऊन हिमालय पूल, किल्ला कोर्ट, प्रेस क्लबच्या समोरून पुढे आझाद मैदानाच्या दिशेने जाणार आहे.
- ह्या पुलांची लांबी ३५० मीटर असणार आहे. तर १८ मीटर रुंदी असणार आहे.
- भुयारी मार्गामध्ये हावा खेळती रहावी म्हणून ठिकठिकाणी डक्ट काढण्यात येणार आहेत. तसेच उच्च क्षमतेचे एक्झॉस्ट फॅन लावण्याची योजना आहे.
- सध्या असलेल्या सीएसएमटी भुयारी मार्गही आझाद मैदानातील मेट्रो स्थानकापर्यंत वाढविण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.