मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना पुण्यातून अटक

मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना पुण्यातून अटक
Updated on

मुंबईः मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक करण्यात आली आहे. डबेवाल्यांना मोफत मोपेड गाडी देण्याच्या प्रकरणाता त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. याच पार्श्वभूमीवर घाटकोपर पोलिसांकडून तळेकरांना अटक केली आहे. 

नेमका आरोप काय?

मुंबईच्या डबेवाल्यांना मोफत मोपेड गाडी देण्याच्या आश्वासनाने ६१ डबेवाल्यांच्या वेगवेगळ्या कागपत्रांवर सह्या घेतल्या. या सह्यांच्या वापर करून भैरवनाथ पथसंस्थेकडून डबेवाल्यांच्या नावाने वाहन कर्ज घेऊन एक रक्कमी धनादेश डीलरकडे सुपूर्त केला. त्यामुळे याप्रकरणात घोटाळा करत फक्त १५ डबेवाल्यांना TVS loona मोपेड गाडी देण्यात आली. २३ डबेवाल्यांना गाड्यांची नोंदणी न करता (passing) गाड्या दिल्या आणि उर्वरित डबेवाल्यांना गाड्या दिल्या नाही. मात्र त्यांच्या नावे कर्ज लादले गेले. 

ही घटना २०१५ ला घडली आहे. गाडी न मिळाल्यामुळे डबेवाल्यांनी आशा सोडली होती. पण अचानक २०१९ ला कर्ज परतफेड न केल्या संदर्भात मालमत्ता जप्तीच्या नोटीसा डबेवाल्यांना भैरवनाथ पथसंस्थेकडून पाठवण्यात आल्या.

आपली फसवणूक झाल्याची कळता डबेवाल्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. डबेवाल्यांनी एकत्रित येत तळेकर आणि आणखी चार जणांविरोधात भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम ४२० अन्वये एफआयआर करत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणा संबंधित सुभाष तळेकर यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार असून, त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या संबंधित विठ्ठल सावंत हे फरार झाले. पोलिसांमार्फत त्यांचा शोध घेत आहेत. 

Mumbai Dabbawala Association President Subhash Talekar arrested from Pune

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.