Mumbai : डबेवाला भवनासाठी जागाच नाही!

आर्थिक तरतुदीनंतरही शिवसेनेचे वचन अधुरे
mumbai
mumbaisakal
Updated on

महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेने मुंबईत डबेवाला भवन उभारण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र सध्या तरी असे भवन उभे राहणे शक्य नसल्याचे दिसत आहे. महापालिका प्रशासनाने तशी माहिती महासभेत सादर केली आहे. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेच्या अर्थसंकल्पातही भवनासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती.

डबेवाला भवन उभारण्याचे आश्‍वासन शिवसेनेने दिल्यानंतर मार्च २०१९ मध्ये महापौर किशोरी पेडणेकर यांनी नगरसेवक असताना त्यासाठी ठरावाची सूचना मांडली होती. महासभेत ठराव मंजूरही केला गेला होता. तेव्हापासून महासभेबरोबरच स्थापत्य समिती (शहर)मध्ये डबेवाला भवन उभारण्यासाठी विविध पर्यायांवर तीन वेळा चर्चा झाली. मात्र प्रशासनाने अद्याप होकार दिलेला नाही. प्रशासनाने सप्टेंबर महिन्याच्या महासभेच्या पटलावर सादर केलेल्या लेखी माहितीनुसार सध्या अनारक्षित भूखंड उपलब्ध नाही. भविष्यात असा भूखंड उपलब्ध झाल्यास त्यावर डबेवाला भवनाचे आरक्षण ठेवता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

डबेवाले जगभरात मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक व्यवस्थापन क्षेत्रांशी संबंधित असलेल्या संस्थांमध्ये व्याख्यानेही दिली आहेत. त्यांच्या भेटी घेण्यासाठी जभगरातून शिष्टमंडळे येतात. मात्र, त्यांना भेटण्यासाठी जागा उपलब्ध नाही. डबेवाल्यांच्या ग्रामीण महाराष्ट्रात राहणाऱ्या कुटुंबातील सदस्य मुंबईत औषधोपचारासाठी येतात, तेव्हा त्यांना जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे डबेवाल्यांसाठी भवन उभारण्यात यावे, असे महापौरांनी ठरावाच्या सूचनेत नमूद केले होते.

प्रशासनाने आतापर्यंत काय सांगितले?

मे २०१९ ः डबेवाला भवनासाठी २०३४च्या विकास आराखड्यात भूखंड आरक्षित ठेवण्यात आलेला नाही, पण ठरावीक स्थान अचूक नमूद केल्यास तसेच खासगी भूखंडावर प्रस्ताव सादर केल्यास त्यावर निर्णय घेता येईल.

मे २०१९ ः महापालिकेच्या ताब्यातील समाजकल्याण केंद्रासाठी आरक्षित असलेल्या भूखंडाचा काही भाग डबेवाला भवनासाठी देणे शक्य नाही. खासगी मालकाकडून त्याबाबत प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्यावर कार्यवाही करता येऊ शकते.

ऑगस्ट २०१९ ः मालमत्ता विभागाकडे सध्या अनारक्षित भूखंड उपलब्ध नाही. भविष्यात असा भूखंड उपलब्ध झाल्यास तो डबेवाला भवनासाठी आरक्षित करता येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.