मुंबई : दादर स्थानकाच्या नामांतरासाठी स्वाक्षरी मोहीम

स्थानकाचे नामकरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करण्याची मागणी
Dadar
DadarSakal
Updated on

मुंबई : दादर स्थानकाचे नामकरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करण्याची मागणी गेली अनेक वर्षे सुरू आहे. विद्यार्थी भारती संघटना यासाठी लढा देत असून याची दखल अद्यापही घेतलेली नाही. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवरील अनेक स्थानकांची नावे सरकारने बदलली आहेत. गेली अनेक वर्षांपासून दादर स्थानकाचे नामकरण करण्याची मागणी विविध संघटनांकडून सुरू आहे. यासाठी संघटनांनी आंदोलने केली आहेत. दादरमध्ये चैत्यभूमी आहे, राजगृह आहे त्या दादरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्याचेच नाव असावे, अशी मागणी विद्यार्थी भारती संघटनेने केली आहे.

Dadar
मुंबई : मद्य विक्रेते व्हिस्की स्कॉचच्या नवीन दराचा प्रतीक्षेत

दर वर्षी ६ डिसेंबर रोजी संघटना याच मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवते. मात्र याची दखल अद्यापही सरकारने घेतली नसल्याने याच मागणीसाठी संघटना यंदाही स्वाक्षरी मोहीम राबविणार आहे. तसेच या मागणीला आणखी बळ देण्यासाठी ऑनलाइन स्वाक्षरी मोहिमही संघटनेने सुरू केली आहे. ऑनलाइन स्वाक्षरी मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून अनुयायांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे संस्थापक किशोर दादा गणाई यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.