डोंबिवली - कल्याण कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दिपक भिंगारदिवे (वय 63) यांचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
दिपक यांचा फिट आल्याने मृत्यु झाला असून याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले.
दिपक यांची पत्नी या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याविषयी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यासोबतच त्यांनी ठाण्यात ही मगरुरी कशाने वाढली आहे.
मुंब्राच्या खाडीत जाळं टाकलं तर कायद्याची सगळी पुस्तक मिळतील अशी प्रतिक्रीया त्यांनी या घटनेवर दिली आहे. आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे.
कोळसेवाडी पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री दिपक यांचा मृत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मारहाण केल्याने दिपक यांचा मृत्यु झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
तर पोलिसांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. याप्रकरणाचाी सीआयडी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शुक्रवारी रात्री कोळसेवाडी पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले.
या दरम्यान पोलिसांनी प्रशिक भिंगारदिवे (वय 23) याला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरु केली. प्रशिक याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती त्याचे वडिल दिपक यांना मिळाल्याने दुसरा मुलगा गौरव याच्या सोबत ते कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आले होते.
पोलिस ठाण्यात काही वेळाने त्यांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. दिपक हे कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आपल्या मुलाला पोलिस स्टेशनला का आणले आहे याची चौकशी करण्यासाठी आले होते.
प्रशिक याची चौकशी सुरु असताना दिपक हे त्याची व्हिडीओ शुटींग करत होते. तसेच पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ठाणे अंमलदार कक्षाच्या पाठीमागे बसविले गेले होते.
काही वेळाने त्यांना फिट आल्याने ते खाली कोसळले. त्यांना त्वरीत रुग्णालयात हलविण्यात आले मात्र त्यांना तेथे मृत घोषित करण्यात आले. या सर्व प्रकरण पोलिस ठाण्यातील सीसीटिव्ही मध्ये कैद झालेले आहे.
याची चौकशी सीआयडी मार्फत होत असून सीआयडी अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्याला भेट दिली असल्याची माहिती कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.
कल्याण पूर्वेत भिंगारदिवे कुटूंब रहाण्यास आहेत. दीपक भिंगारदिवे यांचा मुलगा प्रशिक हा बजाज फायनान्स कंपनी मध्ये रिकव्हरी विभागात कामास आहे.
शुक्रवारी रात्री पोलिसांनी प्रशिक याला ताब्यात घेत चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले. यावेळी त्याचे वडील दिपक हे पोलिस ठाण्यात आले होते. वडिल माझी विचारपूस करुन माझा व्हिडीओ काढत होते.
यावेळी पोलिसांनी त्यांना मारहाण केली व त्यांना दुसऱ्या घोलीस फरफटत घेऊन गेले. त्यानंतर त्यांचा मृत्यु झाला. पोलिस सांगतात आकडी आल्याने त्यांचा मृत्यू झाला. परंतु त्यांना कधीही आकडीचा त्रास नव्हता. आम्हाला न्याय हवा आहे.
न्याय मिळत नाही तोपर्यंत दिपक यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे प्रशिक याने सांगितले. तर दिपक यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
शव विच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्युच खर कारण समोर येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दिपक यांची पत्नी नंदा या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आहेत. या प्रकरणाची दखल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घेत यासंबंधी एक ट्विट केले आहे.
ट्विट मध्ये त्यांनी व्हिडीओ देखील शेअर केला आहे. त्यानंतर याविषयी प्रतिक्रीया आव्हाड यांनी दिली असून ते म्हणाले, पोलिसांनी पोराला ताब्यात घेतले.
पोराची काळजी म्हणून बाप सोडवायला गेला. सोडविणे राहीले बाजूला त्यांना इतके मारले की काही मिनीटांतच त्यांचा मृत्यु झाला. म्हणजे हे कोणत्या प्रकारची दादागिरी आहे. ते स्वतः गुन्हेगार नाही, पोरगा गुन्हेगार नाही.
तरीही त्यांचा जीव गेला. ही मगरुरी ठाण्यात कशामुळे आली आहे. कायदा बाजूला ठेवला आहे. कायद्याची सगळी पुस्तक मुंब्राच्या खाडीत जाळं टाकलं तर मिळतील अशी प्रतिक्रीया आव्हाड यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.