Mumbai : रस्त्यांचे बजेट वाढूनही दुरवस्‍था कायम; ७५ टक्‍के खड्डे जैसे थे असल्‍याचा आरोप

पालिका दरवर्षी डांबरी आणि सिमेंट रस्त्यांवर २५०० कोटी खर्च करते. यंदा त्यांनी बजेटमध्ये २५ टक्क्यांची वाढ केली.
Mumbai
MumbaiSakal
Updated on

मुंबई - पालिकेने रस्त्यांसाठीचे बजेट २५ टक्क्यांनी वाढवले आहे. असे असले तरी मुंबईतील काही रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. मग हा सर्व पैसा जातो कुठे, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.

मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून गणली जात असली, तरी तिचा कारभार पाहिला तर सर्वात भ्रष्ट पालिका असल्याचा आरोप माजी खासदार मिलिंद देवरा यांनी केला आहे.

Mumbai
Mumbai Crime : महिला विनयभंग प्रकरण; नीलम गोऱ्हे यांचे लोहमार्ग पोलीस आयुक्तांना पत्र

पालिका दरवर्षी डांबरी आणि सिमेंट रस्त्यांवर २५०० कोटी खर्च करते. यंदा त्यांनी बजेटमध्ये २५ टक्क्यांची वाढ केली.

त्यामुळे मुंबई खड्डेमुक्त होईल, अशी अपेक्षा होती; मात्र बजेटमध्ये वाढ होऊनही २०,००० पैकी केवळ ६,२०० खड्डेच बुजवण्यात आले आहेत; तरीही पालिका त्याच लुटमारांना कोणतीही जबाबदारी न घेता कंत्राटे देत आहे, असेही देवरा म्हणाले.

Mumbai
Pune News : कैदीच देणार आता कैद्यांना कायद्याचे ज्ञान; ‘विधी स्वयंसेवक’ म्हणून बजावणार भूमिका

दुरुस्‍तीपेक्षा खड्डे महाग

पालिका यंदा रस्‍ते दुरुस्‍तीसाठी २५ टक्के अधिक खर्च करत आहे. या वर्षी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या पृष्ठभागाच्या कामासाठी आणि रस्त्यांवरील खराब पॅच दुरुस्त करण्यासाठी १२५ कोटी रुपयांची स्वतंत्र निविदा काढली होती.

असे असून ही मुंबईतील केवळ २५ टक्के खड्डे भरण्यात आले असून अद्याप ७५ टक्क्यांपेक्षा अधिक खड्डे बाकी आहेत. त्यामुळे नवीन रस्ते बनवण्यापेक्षा खड्डे भरणे अधिक महाग ठरले असल्याचे मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे.

Mumbai
Mumbai Crime : सोमवार असल्याने ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा म्हणत डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरीकाची लूट

मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नालेसफाई, रस्ते आणि खड्ड्यांची पाहणी पावसाळ्यापूर्वी केली होती.

तसेच पावसात चुका दिसल्यास जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाईचा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे पालिकेने रस्त्यांची डागडुजी आणि खड्ड्यांसाठी अतिरिक्त बजेटची तरतूद केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.