मुंबईः तब्बल 8 महिन्यांनंतर आता मंदिरं भाविकांसाठी नियम आणि अटींचं पालन करून उघडण्यात आली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे मंदिरं बंद ठेवण्यात आली होती. राज्यासह मुंबईतही मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळं खुली झालीत. मंदिरं पहाटे चार ते पाचच्या सुमारास खुली करण्यात आली. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. कोरोनाचे नियम पाळूनच भाविकांना मंदिरात प्रवेश देऊन दर्शन दिलं जात आहे.
पाडवा आणि भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर ही मंदिरं खुली करण्यात आल्यानं रात्री उशिरापासून दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला, भाविकांना दिवाळाचं भेट दिली. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील मंदिरं मार्च महिन्यापासून बंद करण्यात आली होती.
थर्मल स्क्रिनिंग, मास्क, सॅनिटाझर सोशल डिस्टन्सिंग यासारख्या गोष्टींचं पालन करून भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. मंदिरांमध्ये गर्भवती महिला, लहान मुलं आणी 65 वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या वृद्धांना प्रवेश मिळणार नाही.
सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितलं की, सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे. भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर सज्ज असल्याचंही बांदेकर म्हणाले.
सिद्धिविनायक मंदिरात क्यूआर कोडच्या असलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांना सिद्धिविनायक मंदिराचं अॅप डाऊनलोड करावं लागणारेय. पहिल्या दिवशी 1000 हजार भाविकांना देवाचं दर्शन घेता येणारेय. भाविकांनी मंदिराबाहेर विनाकारण गर्दी करु नये असं आवाहन आदेश बांदेकर यांनी केलंय. भाविकांना दिलेल्या नियोजित वेळेत मंदिरात दर्शन मिळणार आहे. मंदिरात आल्यानंतर भाविकांना सिद्धिविनायक टेंपल अॅपचा क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. अशी माहिती आदेश बांदेकर यांनी दिली.
Mumbai Devotees offer prayers at siddhivinayak mandir temple all religious places reopen from today
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.